Lok Sabha Poll 2024 : उद्धव ठाकरे यांची २०वर्षानंतर ‌खडकवासल्यात सभा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची‌ २० वर्षानंतर पहिल्यांदा खडकवासला परिसरात मंगळवारी संध्याकाळी वारजे येथे पहिल्यांदा सभा होत आहे.
after 20 years uddhav thackeray meeting in khadakwasla pune
after 20 years uddhav thackeray meeting in khadakwasla puneSAkal

खडकवासला : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची‌ २० वर्षानंतर पहिल्यांदा खडकवासला परिसरात मंगळवारी संध्याकाळी वारजे येथे पहिल्यांदा सभा होत आहे. यापूर्वी २००४‌ च्या विधानसभा निवडणुकीची सांगता सभा नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड) रस्त्यावर झाली होती.

सिंहगड रस्त्यावर आनंदनगर परिसरातील मोहिते टाऊनशिपच्या जागेत ठाकरे यांची सभा झाली होती. त्यावेळी शिवसेनेचे मुळशी विधानसभेचे उमेदवार शरद ढमाले हे विजयी झाले होते. त्यानंतर, मतदार संघाच्या पुनर्रचना झाल्यामुळे २००९ मध्ये चांदणी चौकातील वारजे हद्दीत एका हॉटेलमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे शिबिर आयोजित केली होते.

मतदारसंघांच्या फेररचनेत गुहागरच्या बदल्यात खडकवासला मतदार संघ शिवसेनेने भाजपला दिला. त्यामुळे २००४ नंतर उद्धव ठाकरे यांची खडकवासला मतदार संघात सभा झाली नव्हती. लोकसभा विधानसभा ही जागा शिवसेनेकडे नसले तरी येथील त्यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे जाळे मजबूत आहे.

विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार श्याम देशपांडे होते. त्यावेळी शहरातील सर्व मतदारासंगासाठी टिळक रोड येथे सभा झाली होती. असे असले तरी खडकवासला मतदार संघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत आहे. खडकवासला मतदारसंघात मागील पंचवार्षिक मध्ये तीन पंचायत समिती सदस्य निवडून आले होते. एका जिल्हा परिषद मतदार संघात निसटता पराभव झाला होता. ठाकरे हे उद्या बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ सभेसाठी येत आहे.

साहेब १५ वर्षानंतर वारज्यात

निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे यापूर्वी मतदारसंघांची फेररचना झाल्यानंतर २००९ मध्ये सुप्रिया सुळे यांच्या पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी वारजे येथे सभा घेतली होती. त्यानंतर २०११ च्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी हर्षदा वांजळे यांच्या प्रचारार्थ वारजे येथे सभा झाली होती. लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी शरद पवार हे पंधरा वर्षानंतर वारजे येथे सभा घेत आहे.

मविआ’ची जिल्ह्यातील पहिली सभा

महा विकास आघाडीची शरद पवार उद्धव ठाकरे व बाळासाहेब थोरात यांची पुणे जिल्ह्यातील पहिली सभा मंगळवारी वारजे ते होत आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com