भोरला 25 वर्षांनंतर मंत्रिपदाची संधी?

sangram thopte
sangram thopte

कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची चर्चा

भोर (पुणे) ः भोरला सुमारे 25 वर्षांनंतर मंत्रिपदाचा मान मिळण्याची शक्‍यता निर्माण झाल्याने तालुक्‍यातील कॉंग्रेसप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारच्या मंत्रिमंडळात भोरचे आमदार संग्राम थोपटे यांना स्थान मिळावे, अशी मागणी जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुखांकडे केली आहे. त्यास पक्षश्रेष्ठींकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने सलग तिसऱ्यांदा आमदार झालेले संग्राम थोपटे यांना किमान राज्यमंत्रिपद मिळण्याची खात्री कॉंग्रेसप्रेमींना आहे. त्यामुळे भोरला 1993 नंतर मंत्रिपद मिळणार असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे सन 1983 ते 1993 या दहा वर्षांच्या कालावधीत राज्याच्या मंत्रिमंडळात होते. त्यानंतर मात्र तालुक्‍याला मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. परंतु संग्राम थोपटे यांच्या रूपाने ही संधी पुन्हा आली आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांपेक्षा पुणे जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या आमदारांची संख्या जास्त आहे. सन 2014 मध्ये भाजपच्या लाटेतही संग्राम थोपटे जिल्ह्यातून कॉंग्रेसचे एकमेव आमदार होते. कॉंग्रेसकडून विदर्भातील एक आणि पश्‍चिम महाराष्ट्रातून एक अशा दोन आमदारांची राज्यमंत्रिपदी वर्णी लागणार असल्याचे बोलले जात आहे. त्यात पश्‍चिम महाराष्ट्रातून संग्राम थोपटे यांचे नाव प्रथम क्रमांकावर आहे. याशिवाय अनंतराव थोपटे यांचे पाठबळ असल्यामुळे थोपटे यांना राज्यमंत्रिपद मिळण्याची दाट शक्‍यता आहे. आगामी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात भोर तालुक्‍याला संधी मिळेल की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com