Manchar Police Station : तब्बल 45 वर्षानंतर मंचर पोलीस ठाणे स्व मालकीच्या प्रशस्त वास्तुत

मंचर शहरात अपुऱ्या जागेत ४५ वर्षापासून असलेले मंचर पोलीस ठाण्याचे कामकाज क्रीडा संकुलच्या परिसरात नव्याने बांधलेल्या वास्तूत नुकतेच स्थलांतर झाले.
Manchar Police Station
Manchar Police Stationsakal

मंचर - मंचर शहरात अपुऱ्या जागेत ४५ वर्षापासून असलेले मंचर पोलीस ठाण्याचे कामकाज क्रीडा संकुलच्या परिसरात नव्याने बांधलेल्या वास्तूत नुकतेच स्थलांतर झाले आहे. याप्रसंगी खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, पोलीस निरीक्षक अरुण फुगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस उपनिरीक्षक शेखर शेटे, यशवंत यादव व गुप्तचर पोलीस विभागाचे हवलदार राजेश नलावडे यांच्यासह पोलीस अमलदार व कर्मचारी उपस्थित होते.

'मंचर शहरात १९८० पूर्वी पोलीस ठाणे नव्हते. घोडेगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या पश्चिमेला घोडेगाव रस्त्या लगत पोलीस चौकी होती. या पोलीस चौकी मार्फत मंचर, अवसरी खु., पारगाव, वडगाव पीर, लाखणगाव, आदर्शगाव भागडी, महाळुंगे पडवळ, रांजणी व सातगाव पठार आदी ६० गावांचे कामकाज पोलीस चौकी मार्फत पोलीस हवालदार (स्व.) रामभाऊ अवचट पाहत होते.

त्यावेळेचे आमदार किसनराव बाणखेले, माजी आमदार दत्तात्रय वळसे पाटील, विठ्ठलराव चिखले, रामभाऊ थोरात, माजी सरपंच हिदायत अली इनामदार व व्यापार संघटनेने शासन दरबारी पाठपुरावा केला. त्यानंतर मंचर पोलीस ठाण्याचे कामकाज सुरु झाले.” अशी माहिती मंचर व्यापार संघटनेचे माजी अध्यक्ष प्रकाश शहा यांनी दिली.

पाटीलवाडा परिसरात असलेली खाजगी इमारत जुनी व कालबाह्य झाली होती. एकदा तर येथे नागाने बैठक मारल्यामुळे पोलीस यंत्रणेची धावपळ उडाली होती. पहिला मजला कोसळण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली होती.

गृहमंत्री पदाचा पदभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी तातडीने नव्या पोलीस ठाणे इमारतीसाठी आर्थिक तरतूद करून इमारतीसाठी निधी उपलब्ध करून दिला. येथे प्रशस्त इमारत उभी राहिली आहे. अधिकाऱ्यांप्रमाणेच कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसाठीही स्वतंत्र हवेशीरबैठक व्यवस्था, पिण्यासाठी पाणी व स्वच्छतागृह आदी व्यवस्थाकरण्यात आली आहे.

'मंचर शहरापासून उत्तर दिशेला जवळपास एक किलोमीटर अंतरावर नव्या जागेत पोलीस ठाणे हस्तांतरित करण्यात आले आहे. मंचर शहरातील नागरिकांना तातडीच्या वेळी पोलीस मदत मिळण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळे समोर किंवा बस स्थानक परिसरात पोलीस चौकी सुरू केली जाईल. त्यादृष्टीने मंचर नगरपंचायती समावेत चर्चा सुरू आहे.'

- सुदर्शन पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी खेड विभाग.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com