स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी पुन्हा टेन्शनमध्ये; कोरोनानंतर आता आरक्षणामुळे संभ्रम 

ब्रिजमोहन पाटील
Sunday, 13 September 2020

- अडथळ्यांमुळे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी बेजार
- कोरोनानंतर आता आरक्षणामुळे काय होणार याचा संभ्रम 
 - आयोगाकडून स्पष्टतेची मागणी

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास अभ्यास करणारे विद्यार्थी पुन्हा एकदा टेन्शनमध्ये आले आहेत. कोरोनामुळे तीन वेळा परीक्षा पुढे गेली असताना आता मराठा आरक्षणाता मुद्दा उपस्थित झाला आहे. या सततच्या अडथळ्यांमुळे विद्यार्थी बेजार झाले आहेत. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) अधिकृत स्पष्टता द्यावी अशी मागणी उमेदवार केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

'एमपीएससी'ची राज्यसेवा पूर्व परीक्षा, दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब, आणि अभियांत्रिकी संयुक्त पूर्व परीक्षा एप्रिल आणि मे महिन्यात होणार होती. पण कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. त्यानंतर सप्टेंबर- ऑक्टोबरची परीक्षा पुढे ढकलून आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. सतत परीक्षा पुढे ढकलली जात असल्याने विद्यार्थी मानसिक तणावाखाली आलेले आहेत.

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे हजारो विद्यार्थी 'एसईबीसी' लाभ घेऊन अधिकारी बनण्याचे स्वप्न बघत आहेत. पण आरक्षणाला स्थगिती दिल्याने 'एसईबीसी' प्रवर्गातून अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांचे काय होणार, त्यांना पुन्हा खुल्या गटाचा दर्जा मिळणार का? अशा शंकांमुळे गोंधळाची स्थिती आहे. याबाबत आयोगाने स्पष्ट आणल्यास गोंधळ कमी होईल अशी अपेक्षा आहे. यासंदर्भात आयोगाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन बंद होता.  

मराठा आरक्षणावरून शासनाचाच 'गोंधळात गोंधळ'; सुधारित आदेश काढल्याने विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा

"सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला  स्थगिती दिली असली तरी यापूर्वीच्या प्रक्रियेला बाधा नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरलेले आहेत व त्यांची परीक्षा होणार आहे. त्यांच्या वर कोणताही परिणाम होणार नसल्याचे या आदेशावरून दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणतीही चिंता न करता परीक्षेचा अभ्यास करावा."
- बाळासाहेब गुजर, वकील

" एप्रिल महिन्यापासून स्पर्धा परीक्षेच्या वेळापत्रकावर अनिश्चितता आहे. त्याचा परिणाम अभ्यासावर होत आहे. आता मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झालेला असल्याने याबाबत आयोगाने अधिकृत स्पष्टता दिल्यास आम्हाला दिलासा मिळेल."
- बबन दाडगे , स्पर्धा परीक्षा विद्यार्थी

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी : शैक्षणिक शुल्क होणार कमी? समितीच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष​

"परीक्षा आता इतकी जवळ आलेली आहे की, आरक्षण किंवा या मुद्द्यांवर विचार करण्यासाठी वेळ नाही. अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. पण सरकारने योग्य विचार करून गोंधळ व राजकारण न करता योग्य पाऊल उचलून उमेदवारांना दिलासा द्यावा."
- सारंग खांडेकर, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: after corona Competitive exam students are again in tension due to confusion of reservations