esakal | मराठा आरक्षणावरून शासनाचाच 'गोंधळात गोंधळ'; सुधारित आदेश काढल्याने विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा
sakal

बोलून बातमी शोधा

Maratha_Reservation

ज्या महाविद्यालयांनी किंवा शिक्षण संस्थांनी 2020-21 या शैक्षणिक वर्षात पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश दिले आहेत, त्यांनी ही सर्व प्रक्रिया मागे घ्यावी, या वर्षासाठी 'एसईबीसी' हे आरक्षण लागू होणार नाही. हे आरक्षण वगळून प्रवेश प्रक्रिया राबविता येईल, असे आदेश दिले होते.

मराठा आरक्षणावरून शासनाचाच 'गोंधळात गोंधळ'; सुधारित आदेश काढल्याने विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली असताना आपल्या करियरचे काय होणार? असा प्रश्‍न लाखो विद्यार्थ्यांना पडलेला आहे. असे असतानाच उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा अभूतपूर्व गोंधळ समोर आला. शुक्रवारी (ता. 11) तातडीचे परिपत्रक काढून मराठा आरक्षणानुसार पदवी प्रथम वर्षाचे सर्व प्रवेश रद्द केल्याचे आदेश काढले. मात्र, चूक लक्षात येताच, शनिवारी (ता.12) सुधारित आदेश काढत हे परिपत्रक रद्द केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी : शैक्षणिक शुल्क होणार कमी? समितीच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष​

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देऊन ते खंडपीठाकडे पुढील सुनावणीसाठी पाठविले आहे. राज्य सरकारने याबाबत पुढे काय करायचे याबाबत अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे इयत्ता 11वी पासून ते उच्च शिक्षणाच्या स्तरावर संभ्रम निर्माण झालेला आहे.
दरम्यान, न्याय व विधी विभागाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशासंदर्भात दिलेल्या अभिप्रायावरून उच्च व तंत्र शिक्षण विभागाने तातडीचे परिपत्रक काढले.

साडेसातशे लिटर भेसळयुक्त तूप जप्त; वडगावशेरीतील कारखान्यांवर 'एफडीए'चे छापे​

त्यामध्ये ज्या महाविद्यालयांनी किंवा शिक्षण संस्थांनी 2020-21 या शैक्षणिक वर्षात पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश दिले आहेत, त्यांनी ही सर्व प्रक्रिया मागे घ्यावी, या वर्षासाठी 'एसईबीसी' हे आरक्षण लागू होणार नाही. हे आरक्षण वगळून प्रवेश प्रक्रिया राबविता येईल, असे आदेश दिले होते. या आदेशामुळे पदवीचे झालेले प्रवेश रद्द होणार असल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे शनिवारी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने पुन्हा एक परिपत्रक काढून प्रवेशासंबंधी 11 सप्टेंबर रोजी काढलेले परिपत्रक रद्द केले आहे, शासनाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल असे स्पष्ट केले.

महाराष्ट्रीयन क्रिकेटरने बनवली देशातली पहिली 'कार्गो सायकल'; वाचा या अफलातून सायकलविषयी​

"महाविद्यालयांमध्ये पदवी प्रथम वर्षाचे प्रवेश शेवटच्या टप्प्यात आलेले असताना प्रवेश रद्द केल्याचे परिपत्रक काढल्याने यंत्रणेला, विद्यार्थ्यांना त्रास झाला. मात्र, उशिरा का होईना चूक सुधारत हे परिपत्रक रद्द केल्याबद्दल शासनाचे धन्यवाद. अशा विषयांमध्ये अभ्यास करून परिपत्रक काढल्यास असे गोंधळ टाळता येतील.
- ऍड. एस. के. जैन, अध्यक्ष, नियामक मंडळ, शि.प्र. मंडळी.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image