
Pune Rain Update
Sakal
पुणे : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रविवारी (ता. २८) मात्र विश्रांती घेतली. त्यामुळे पुणेकरांना थोडासा दिलासा मिळाला. पुढील दोन दिवसांत शहरात पावसाचा जोर आणखी ओसरणार आहे. मात्र, पुण्याच्या दौंड, इंदापूर, बारामती आणि शिरूर या विभागांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.