मनसेतून बाहेर पडल्यानंतर रुपाली पाटील-ठोंबरे राष्ट्रवादीत दाखल

मनसेच्या अंतर्गत वादाला कंटाळून दिला होता राजीनामा
Rupali Patil Thombre
Rupali Patil Thombre

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बाहेर पडल्यानंतर रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil Thombre) यांनी गुरुवारी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत मनसेच्या अनेक महिला कार्यकर्त्यांही आहेत. पुण्यातील मनसेच्या धडाडीच्या महिला कार्यकर्त्या म्हणून रुपाली पाटील यांची ओळख होती. त्या मनसेच्या पुणे शहराच्या महिला सेनेच्या उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक राहिल्या आहेत. (after leaving MNS Rupali Patil Thombre joined NCP Pune)

Rupali Patil Thombre
शरद पवार साहेबांना आशीर्वाद देतील असे ‛हात’ नाहीत - रुपाली पाटील

पुणे महापालिकेच्या (PMC) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. पण मनसेच्या पुण्यातील नेतृत्वाच्या मनमानी कारभाराला कंटाळून आपण मनसे सोडत असल्याचं रुपाली पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. पण आपण कोणत्या पक्षात प्रवेश करु हे त्यांनी उघड केलं नव्हतं. पण आज त्यांनी अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

राष्ट्रवादीत प्रवेशापूर्वी केलं होतं सूचक ट्वीट

रुपाली पाटील यांनी मनसेचा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट केली होती. यामध्ये त्यांनी म्हटलं की, आज शरद पवार (Sharad Pawar) साहेबांना आशीर्वाद देऊ शकतील असे ‛हात’ नाहीत व पवार साहेब झुकून नमस्कार करतील असे ‛पाय’ दिसत नाहीत; हो म्हणूनच ठरलंय! या वटवृक्षाच्या सावलीत महाविकास आघाडीत स्थिरावणार. रुपाली पाटील यांनी ट्विटरवर ही पोस्ट करताना राष्ट्रवादी, शिवसेना (Shivsena) आणि काँग्रेसलासुद्धा (Congress) टॅग केलं आहे.

कोण आहेत रुपाली पाटील?

रुपाली पाटील या व्यावसायानं वकील आहेत. पक्षाच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत गेली १४ वर्षे त्या मनसेसोबत होत्या. सन २०१२ मध्ये महापालिका निवडणुकीत त्या मनसेच्या तिकिटावर नगरसेवक झाल्या. पुढच्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानतंरही त्या राजकारणात सक्रीय होत्या. विधानसभेच्या सन २०१९ च्या निवडणुकीत त्यांची कसबा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा होती. मात्र त्यांच्याऐवजी मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांना तिकिट देण्यात आले. पक्षासाठी निष्ठेनं काम करत असतानाही वारंवार आपल्याला डावललं जात असल्याचं सांगत अनेकदा मुलाखतींमधून त्यांनी पक्षातील अंतर्गत वादावर भाष्य केलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com