हुश्श!...शेवटी नऊ तासांनी कावळ्याची मांज्यातून सुटका झालीच

After nine hours in Shaktinagar, the crow has been released from its cage2.jpg
After nine hours in Shaktinagar, the crow has been released from its cage2.jpg

घोरपडी (पुणे) : बी.टी. कवडे रास्ता येथील शक्तीनगरमधील तरुणांनी नायलॉन मांज्यात अडकलेल्या कावळ्याचे प्राण वाचवले. येथील निलगिरीच्या झाडावर असलेल्या नायलॉन मांज्यात पंख आणि पाय अडकले होते. जवळपास नऊ तासांनी कावळ्याची सुखरूप सुटका झाली.

 पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 
बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास कावळा निलगिरीच्या झाडावर अडकलेल्या नायलॉन मांज्यात फसला. स्थानिक तरुणांनी त्याचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न केले. परंतु कावळा खूप उंचीवर असल्यामुळे ते अपयशी झाले. त्यानंतर अग्निशामक दलास फोन केला. त्यांनी एक पक्षीमित्राचा फोन नंबर दिला. काही वेळाने पक्षीमित्र आल्यानंतर कावळा खूप उंचीवर असून त्यासाठी साहित्य आणावे लागेल म्हणून तो निघून गेला. जाताना त्याने साहित्यासाठी २०० रुपये घेऊन गेला. खूप वेळ झाला तरी पक्षीमित्र न आल्यामुळे स्थानिकांनी पुन्हा अग्निशमन दलास फोन केला. तेव्हा त्यांच्याकडून पक्षी उंचावर असल्याने काढण्यास असमर्थता दर्शवली. 

स्थानिक तरुण रोहित गवळी, आकाश राऊत, गणेश चौबे, अजिंक्य गवळी यांनी पक्षाला सुरक्षितपणे काढण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले. जवळच्या चार मजली इमारतीच्या गच्चीवरून झाडावर दोरी टाकून त्याचे पंख आणि पाय मांज्यामध्ये फसलेले होते, ती फांदी तोडली. अखेर दुपारी दोन वाजता जवळपास नऊ तासांनी कावळ्याची सुटका झाली. 

रोहित गवळी यांनी सांगितले, की सकाळपासून आम्ही अग्निशामक दल, पक्षी मित्र, स्थानिक नगरसेवक आणि इतर अनेक लोकांना संपर्क केला पण कोणीही मदत केली नाही. अखेर आम्हीच खूप प्रयत्न करून त्या कावळ्याची सुटका केली. नऊ तास तो झाडावर उलटा लटकत होता, त्याच्या आवाज आणि वेदना पाहून फार वाईट वाटत होते. म्हणून आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करून त्याची सुटका केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com