esakal | Pune : भाविकांसाठी मंदिरांची दारे आज उघडली
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : भाविकांसाठी मंदिरांची दारे आज उघडली

sakal_logo
By
विठ्ठल तांबे

धायरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षापासून बंद असलेली मंदिरे राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत करून आज गुरुवारी घटस्थापनेच्या दिवशी भाविकांनसाठी उघडण्यात आली.भाविकांमध्ये उत्साहचे आनंदाचे वातावरण पाहवयास मिळत आहे. आज नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत असल्यामुळे सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे, वडगाव, धायरी मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरणात घटस्थापना ही करण्यात आली.

नऱ्हे,वडगाव धायरी परिसरात सकाळी सहा पासूनच मंदिर भक्तांसाठी खुली करण्यात आलीअसून. यासाठी आदल्या दिवशीच मंदिराची स्वच्छता करून घेण्यात आली. शासनाने घालून दिलेल्या नियमाचे काटेकोर पालन करून मास्क, सॅनिटायझर, शारीरिक अंतर ठेवून व नागरिकांना दर्शन देण्यात येईल, असेही सर्व मंदिरांच्या समितीने निर्णय घेण्यात आला आहे.

घटस्थापनेच्या मुहूर्तावरच मंदिर खुली झाल्यामुळे वडगाव धायरी नऱ्हे येथील स्वामी नारायण मंदिर, भैरवनाथ मंदिर, धायरेश्वर मंदिर, महालक्ष्मी मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, वाघजाई मंदिर, तुकाई माता, राममंदिर येथे भक्त जणांनी दर्शनाचा लाभ घेतला.

loading image
go to top