शनिवारवाड्यानंतर आता केळकर संग्रहालय आजपासून होणार खुले   

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 January 2021

संग्रहालयाचे संस्थापक कै. डॉ. दि. गं. केळकर यांनी 1920 दरम्यान संग्रहालयासाठी पहिली वस्तू मिळवली. त्या घटनेला यंदा 100 वर्षे पूर्ण होत आहे. तसेच कै. केळकर यांची रविवारी 126 वी जयंती आहे.

पुणे :  ऐतिहासिक घटनांचा वारसा जपणारे राजा दिनकर केळकर संग्रहालय रविवारपासून (ता 10) पूर्ववत खुले होणार आहे. नुकताच शनिवारवाडा खुला करण्यात आला. त्यासह शहरातील इतर अनेक ऐतिहासिक वास्तू सुरू करण्यात येत आहेत. त्यात आता केळकर संग्रहालयाची देखील भर पडली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संग्रहालयाचे संस्थापक कै. डॉ. दि. गं. केळकर यांनी 1920 दरम्यान संग्रहालयासाठी पहिली वस्तू मिळवली. त्या घटनेला यंदा 100 वर्षे पूर्ण होत आहे. तसेच कै. केळकर यांची रविवारी 126 वी जयंती आहे. या दोन्ही ऐतिहासिक घटनांचे औचित्य साधून त्यांची कन्या रेखा हरी रानडे यांच्या उपस्थितीत आणि शिल्पकला अभ्यासक व संग्रहालयाच्या व्यवस्थापन मंडळावरील तज्ज्ञ सदस्य डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते संग्रहालयाचे प्रवेशद्वार खुले होणार आहे. हा कार्यक्रम रविवारी सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. कार्यक्रमादरम्यान कै. केळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी केली जाणार आहे, अशी माहिती संग्रहालयाचे संचालक सुधन्वा रानडे यांनी दिली.

'क्षमता नसेल, तर ऑफलाइन परीक्षा घ्या'; अधिसभा सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनाला घेतले फैलावर

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे जिल्ह्यातील सर्व संग्रहालये व पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात आली होती. मात्र अनलॉकनंतर आता संग्रहालये व पर्यटनस्थळे खुली करण्याची परवानगी प्रशासनामार्फत देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व खबरदारी बाळगून संग्रहालय सुरू करण्यात येत असल्याचे रानडे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After shaniwarwada the Kelkar Museum will be open from today