Pune News : हिच खरी मैत्री! पोलिस मित्राच्या मृत्यूनंतर मित्रांनी जमा केले ११ लाख रुपये

police
police

पुणे : मैत्री खरी असली की ती अडचणीत कायम साथ देते. जेथे रक्ताचे नाते कामात येत नाहीत तिथे मैत्रिचे नाते नेहमी हजर असते. असाच काहीसा प्रकार पुण्यात घडला आहे. पुणे पोलिस दलातील भरोसा सेलमध्ये कार्यरत असणारे अमलदार नितीन शिंदे यांचे १ फेब्रुवारी रोजी एका अपघातात निधन झाले होते. या घटनेमुळे संपूर्ण शिंदे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. 

शिंदे यांच्या मुली पोरक्या झाल्या होत्या. मात्र मित्रांनी मदतीचा हात पुढे केला. नितीन शिंदे यांच्या मित्रांनी तब्बल ११ लाख रूपये जमवले. नितीन शिंदे यांच्या लहान मुलींसाठी ही रक्कम जमवण्यात आली. 

शिंदे कुटुंबीयांसाठी पुणे पोलिस दल मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. मैत्री जपण्यासाठी आणि हीच मैत्री सदैव पुढे राहावी यासाठी नितीनच्या मित्रांनी ११ लाख रुपये जमा केले आहेत. 

police
Javed Akhtar:'सलीम खान सोबतची मैत्री तुटण्याचं दुःख वाटतं?', 'नाही' म्हणत अख्तरांनी थेट सांगितलं कारण..

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिस दलातील २००७ च्या बॅच मधील पोलिसांनी १,००० पासून ते १०,००० रुपयांपर्यंत मदत जमा केली. एकमेकांना सोशल मीडियावरुन आवाहान करत अवघ्या १० दिवसात ११ लाख रुपये रक्कम जमा झाली आहे. ही सर्व रक्कम नितीन यांच्या मुलींसाठी फिक्स डिपॉजिटमध्ये ठेवली जाईल. नितीन आमच्या ह्रुदयात कायम राहील या भावनेने या मित्रांनी एकत्र येत हा उपक्रम राबवला

police
CBI Raid : मोदींच्या गुजरातमध्ये कर अधिकाऱ्याच्या घरात सापडलं मोठं घबाड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com