Rupali Thombre : मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रुपाली पाटलांनी व्यक्त केली आमदारकीची इच्छा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rupali Thombre

Rupali Thombre : मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रुपाली पाटलांनी व्यक्त केली आमदारकीची इच्छा

भाजपच्या आमदार आणि पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचं दीर्घ आजारानं गुरुवारी निधन झालं. गेल्या काही महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. त्यांच्या निधनानंतर अवघ्या पाचच दिवसात राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी आमदार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षाने संधी दिल्यास निवडणूक लढवणार अशी घोषणा रूपाली पाटील यांनी करताच राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता दिसून येत आहेत. काल रूपाली पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली आहे.

हेही वाचा: Shivsena : CM शिंदेंनी काही दिवसांपूर्वीचं उद्घाटन केलेल्या पहिल्या कार्यालयावर अतिक्रमणाची कारवाई

वरिष्ठांना न विचारताच त्यांच्याशी न बोलतच रूपाली पाटील यांनी त्यांची भूमिका मांडल्यामुळे शहरातील पदाधिकारी त्यांच्यावर नाराज असल्याचे दिसून येत आहे. नाराज पदाधिकारी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यापर्यंत तक्रार करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

यावेळी बोलताना रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या, "राष्ट्रवादी काँग्रेसने आदेश दिला तर मी कसबा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास तयार आहे. मुक्ताताईंच्या नंतर त्यांच्या घरात राजकारणात येण्यासाठी आणि निवडणूक लढवण्यासाठी कोणीही नाही. त्यांचे पती राजकारणात सक्रिय नाहीत, मुलगा सुद्धा लहान असून त्याचं नुकतंच लग्न झालं आहे"

हेही वाचा: Dada Bhuse : हा *** शिवीगाळ करत दादा भुसेंची पोलिसांसमोर तरुणाला जबर मारहाण

मुक्ता टिळक यांच्या निधनाला 5 दिवसच झाले आणि रूपाली पाटील यांनी लगेच निवडणूक लढण्याची इच्छा दर्शवली आहे त्यामुळे जनमानसात चुकीचा संदेश जात असल्याचे मत राष्ट्रवादी पदाधिकारी यांनी व्यक्त केले आहे. मुळात राज्यात महाविकास आघाडी आहे. त्याचबरोबर कसबा विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसकडे असूनही रूपाली पाटलांनी या ठिकाणी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. रूपाली पाटलांनी भूमिका मांडल्यामुळे पक्षांतर्गत नाराजीचे सुर दिसून येत आहेत.

हेही वाचा: Mukta Tilak : भाजप आमदार मुक्ता टिळक यांचं निधन