पुणे : कोरोनाविरुद्धचा लढा जिंकून सिद्धार्थनगरमधील नऊजण परतले घरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मे 2020

येथील सिद्धार्थनगर वसाहतीमधील नऊजण कोरोना विरुद्ध लढा जिंकुन घरी परतले त्यावेळी  वस्तीतील रहिवाशांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे जंगी स्वागत केले. 

रामवाडी : येथील सिद्धार्थनगर वसाहतीमधील नऊजण कोरोना विरुद्ध लढा जिंकुन घरी परतले त्यावेळी  वस्तीतील रहिवाशांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे जंगी स्वागत केले. सकारत्मक विचार चांगली प्रतिकार शक्ती आणि वेळेत मिळालेले वैद्यकीय उपचार या जोरावर वस्तीतील दोन वर्षीच्या लहान बाळापासून ते  58 वर्षाच्या व्यक्तीने असे एकुण नऊजणांनी कोरोनाला हरवले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सिद्धार्थनगर वसाहतीमध्ये एका 42 वर्षीच्या व्यक्तीचा  कोरोनाने मृत्यू झाला होता. त्यांच्या संपर्कात आलेल्या  46 व्यक्तीची कोरोना टेस्ट केली होती.  त्यामध्ये नऊ जणांचे रिपोर्ट् पॉझिटिव्ह आला होता. उपचारानंतर सर्वांची तब्येत ठणठणीत आहे. 

कोरोनात मृत्यू झालेल्या व्यक्तीला सर्दी खोकला त्रास होत असल्याने  शास्त्रीनगर येथील महापालिकेच्या कै.दामोदर गलांडे दवाखान्यात कोरोनाची  टेस्ट करण्यात आली होती. त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने उपचारासाठी  खराडी येथे पालिकेच्या दवाखान्यात ठेवण्यात आले होते . दोन दिवसांनी त्या  व्यक्तीचा मृत्यू झाला होता.  त्याच्या संपर्कात आलेल्या 46 व्यक्तींची स्वॅब तपासणी करण्यात आली होती. त्यात नऊजण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सिद्धार्थनगर वसाहत ही गजबजलेला परिसर दाटी़वाटीने दहा बाय दहाच्या  घरात राहणारे एकूण दोनशे अठरा कुटुंब आहे. याच वसाहतीतील नऊ नागरिकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. नगररोड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या भागातील  कोरोनाने बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 76 आहे.  तर मृत्यू पावलेली संख्या 4 आहे.

इंद्रायणी घाटावर गुंडांची दहशत; रात्रीच्या काळोखात लुटतायेत नागरिकांना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After winning the battle against Corona the nine returned home