पुणे : 'अफजल खानाचा वध' देखाव्याला अखेर पोलिसांकडून परवानगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

afzal khan killing scene pune ganesh festival live performance of afzal khan killing scene

पुणे : 'अफजल खानाचा वध' देखाव्याला अखेर पोलिसांकडून परवानगी

पुणे : अफजल खानाचा वध हा देखावा सादर करण्यास कोथरुड पोलीस ठाण्याकडून अखेर परवानगी देण्यात आली आहे. कोथरूड पोलिसांकडून संगम तरुण मंडळाला ही परवानगी दिली आहे, कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्याकडून परवानगी देण्यात आली आहे

मुंबईमध्ये दहिहंडीच्या उत्सवात गोविंदांनी अफझल खानाचा वध हा देखावा सादर केला होता. मात्र, पुण्यात या देखाव्याला परवानगी नाकारल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत होते. आता गणेशोत्सवाचा अनुषंगाने दिलेल्या परवानगीचा भंग होणार नाही याची दक्षता घ्या, असे आवाहन पोलिसांकडून मंडळाला करण्यात आले आहे. दरम्यान हा देखावा साकारण्याची परवानगी मिळाल्याने गणेश मंडळाकडून होणारे आंदोलन रद्द करण्यात आले आहे.

हेही वाचा: जनतेसाठीचे 'हे' ५ मुद्दे रखडलेत अन् आमदार विधीमंडळात धक्काबुक्की करतायत

प्रकरण काय आहे?

कोरोना महामारीच्या काळात पुण्यातील गणेशउत्सव अत्यंत शाध्या पध्दतीने साजरा करण्यात आला होता, मात्र आता तब्बल दोन वर्षानंतर यंदा पुण्यात गणेश उत्सवाची जोरदार तयारी करण्यात येत आहे. या तयारीदरम्यान कोथरुड परिसरातील गणेश मंडळाच्या देखाव्यावरून वाद पेटला होता. गणपती मंडळाने यंदा 'अफझल खान वध' हा देखावा साकारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे कारण देत संगम तरुण मंडळाला हा देखावा साकारण्यास परवानगी नाकारली होती. त्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात होता. मंडळाने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता

हेही वाचा: राज्यात कुपोषणामुळे एकही मृत्यू नाही; मंत्र्यांची माहिती, अजित पवार भडकले!

Web Title: Afzal Khan Killing Scene Pune Ganesh Festival Live Performance Of Afzal Khan Killing Scene

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..