Pune : सिनेक्रोन टेक्नॉलॉजी कंपनीतर्फे प्राथमिक शाळांना मोफत 500 संगणक वाटप

आगळे म्हणाले “आंबेगाव तालुक्यातील नऊ प्राथमिक शाळांना संगणक व इन्व्हटर वितरण सिनेक्रोन टेक्नॉलॉजीस प्रा.लि.यांच्या सीएसआर फंडातून वाटप करण्यात आले आहे.
Computer inventor distribution  nine primary schools  Ambegaon
Computer inventor distribution nine primary schools Ambegaonsakal

मंचर - “जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची संगणकाशी मैत्री व्हावी म्हणून आंबेगाव,खेड, मावळ, मुळशी, अक्कलकोट, पारनेर तालुक्यात आत्तापर्यंत मोफत५०० संगणक वाटप केले आहेत. यापुढे प्राथमिक शाळांमध्येच संगणक वितरण करण्याचे धोरण सिनेक्रोन टेक्नॉलॉजीस कंपनीचे आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांचा आधुनिक तंत्रज्ञानाचा पाया भक्कम होईल.त्यांना भविष्यात देश व जागतिक स्तरावरील नामवंत आयटी कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी मिळेल.”असे सिनेक्रोन टेक्नॉलॉजीस कंपनीचे प्रशासकीय व्यवस्थापक राजेश आगळे यांनी सांगितले.

मंचर (ता.आंबेगाव) येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या सभागृहात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महात्मा गांधी व विद्यालय, मंचर गावठाण, मुळेवाडी, वाळुंजवाडी,मोरडेवाडी, निघोटवाडी, लौकी, वडगाव काशिंबेग यांना २५ संगणक व इन्व्हटर संच सिनेक्रोन टेक्नॉलॉजीस कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मे यांग,

संचालक रफिक नदाफ, प्रशासकीय व्यवस्थापक राजेश आगळे, कायदेशीर सल्लागार सैफन मुजावर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्वाती घुले, धनंजय घुले, लहू बागल, विशाल मोरडे उपस्थित होते.

आगळे म्हणाले “आंबेगाव तालुक्यातील नऊ प्राथमिक शाळांना संगणक व इन्व्हटर वितरण सिनेक्रोन टेक्नॉलॉजीस प्रा.लि.यांच्या सीएसआर फंडातून वाटप करण्यात आले आहे. तसेच यापुढे महिला सक्षमीकरण व शेती विकसित होण्यासाठी शाश्वत पाणी उपलब्ध करून देण्याचे धोरण राबविले जाईल.”

मे यांग म्हणाल्या “ग्रामीण भागातील प्राथमिक शाळेत शिक्षण घेतलेल्या मुलामुलींनी इंग्रजीत भाषण करून स्वच्छतागृहा बाबत केलेल्या मागणीचा प्राधान्याने विचार केला जाईल.”

रफिक नदाफ, मंचर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, राजाराम बाणखेले, सुरेश घुले, प्राचार्य उत्तम आवरी, मुख्याध्यापक शैलेंद्र चिखले यांची मनोगते झाली. किसन गुडदे यांनी सूत्रसंचालन व यादव चासकर यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com