सौर ऊर्जेवरील प्रस्तावित शुल्क आकारणीला विरोध

agitation against extra charge on solar power
agitation against extra charge on solar power
Updated on

पुणे : महावितरणने सौर ऊर्जेचा वापर करणाऱ्या आणि भविष्यात असे प्रकल्प उभारू इच्छिणाऱ्या सर्वच ग्राहकांकडून  “ग्रिड सपोर्ट चार्जेस”  या नावाखाली किमान  ४  ते ८ रु प्रती युनिट अशी अवाजवी दरवाढ प्रस्तावित केली आहे. सौर उर्जेवर कोणतेही शुल्क लावण्यास विरोध करत महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर असोशिएशनतर्फे उद्यापासुन (ता. ४) विभागीय आयुक्त कार्यालय येथे साखळी उपोषण करण्यात येणार आहे.

संघटनेच्या वतीने आज (ता.३) महावितरणचे मुख्य अभियंता, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे स्वप्नील बाठे,  अक्षय कुडची, समीर गांधी, संकेत शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

नवी मुंबईत निवडणुकांपूर्वी 'लिंबू मिरचीचा खेळ चाले'

महावितरण कडून सर्वच स्तरावरील सौर ऊर्जेचा वापर करणाऱ्या आणि भविष्यात असे प्रकल्प उभारू इच्छिणाऱ्या सर्वच ग्राहकांकडून  “ग्रिड सपोर्ट चार्जेस” या नावाखाली किमान  ४  ते ८ रु प्रती युनिट अशी अवाजवी दरवाढ प्रस्तावित केली आहे. यासाठी महावितरणने वीज नियामक आयोगाकडे दाखल केली आहे. वीज नियामक आयोगाने या संदर्भात ६ फेब्रुवारी रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात सार्वजनिक सुनावणी आयोजित केली आहे.

अंडरवेअरमध्ये मोबाईल लपवून परिक्षेत करायचा कॉपी; मग...

नागरिकाने स्वतः सर्व गुंतवणूक करून, स्वतः च्या वापराकरिता निर्माण केलेत्या उर्जेवर कोणतेही शूल्क लावणे कायदेशीर दृष्ट्या संपूर्ण अयोग्य आहे. देशामध्ये इतर कोणत्याही राज्यात अशा प्रकारची अन्यायकारक दर आकारणी अस्तित्वात नाही. महाराष्ट्रात ही दरवाढ ग्राहकांवर लादण्याचे आणि सौर उर्जेचा वापराला खीळ घालण्याचे षडयंत्र पुढे येत आहे. यामुळे आयोगाने या उर्जेवर शुल्क लावण्यास केलेली तरतूद रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरवाढीविरोधात दि. ४ ते  ६ फेब्रुवारी या कालावधीत विभागीय आयुक्त कार्यालय येथे साखळी उपोषण करण्यात येणार आहे, असे स्वप्नील बाठे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com