esakal | "बौद्ध समाजातील भूमीहीन शेतकऱ्यांच्या मूळजमिनी परत द्याव्यात" IDam
sakal

बोलून बातमी शोधा

पीपल्स रिपब्लिकन पक्ष

"बौद्ध समाजातील भूमीहीन शेतकऱ्यांच्या मूळजमिनी परत द्याव्यात"

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा - सकाळ वृत्तसेवा

इंदापूर : उजनी धरणाच्या कालव्यासाठी विना मोबदला संपादित बौद्ध समाजातील १५० भूमीहीन शेतकऱ्यांच्या मूळजमिनी त्यांना परत द्याव्यात या मागणीसाठी गुरुवार दि.३० सप्टेंबर रोजी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भीमानगर ( ता. माढा जि. सोलापूर ) येथे सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

पीपल्स रिपब्लिकन पक्ष कवाडे गटाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी टेम्भुर्णी पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या आंदोलनात इंदापूर तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सागर मिसाळ, सामाजिक कार्यकर्ते नितीन आरडे,श्री.देवकर यांच्यासह भूमिहीन शेतकरी कुटुंबासमवेत सहभागी झाले होते.

यावेळी संजय सोनवणे म्हणाले,मौजे रांझणी (ता. माढा जि. सोलापूर ) येथील बौद्ध समाजातील शेतकऱ्यांच्या जमिनी ४० वर्षां पूर्वी पुणे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महा मंडळाकडे संपादित करण्यात आल्या. त्याचा कुठलाही मोबदला शेतकऱ्यांना दिला गेला नाही. त्यामुळे त्यांना न्याय देण्यासाठी दि. २१ सप्टेंबर पासून उजनी धरण व्यवस्थापन कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. त्याची दखल माढयाचे तहसीलदार श्री.चव्हाण यांनी सहाव्या दिवशी घेतली मात्र त्यांनी हा विषय उजनी धरण व्यवस्थापचा असल्याचे सांगितले .त्यामुळे आंदोलन सुरूच राहिले. मात्र उजनी प्रशासनाने दखल न घेतल्याने दहाव्या दिवशी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा: वारंवार रस्ते कसे अडवले जाऊ शकतात? SCचा केंद्राला सवाल

सध्या प्रशासनाकडून उजनी जलाशय पर्यटनविकास केंद्र आराखड्याचे काम सुरु आहे, यातून मौजे रांझणी येथील जमीन गट क्र.५५/५६ ला वगळावे, प्रशासनामधील जे अधिकारी चुकीच्या पद्धतीने काम करीत आहेत,त्यांची चौकशी करुन कारवाई करावी, सध्यापडीक असलेल्या जमिनी मूळ शेतकऱ्यांनाकसण्यास द्याव्यात या आमच्या मागण्या असून मूळ शेतकऱ्यांना जमिनी मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. दरम्यान ही बाब न्यायप्रविष्ट असल्याने जो पर्यंत न्यायालयाचा निर्णय होत नाही, तो पर्यंत काहीही निर्णय घेता येत नसल्याचे उजनी धरण व्यवस्थापनाने स्पष्ट केले.

loading image
go to top