teachers agitation
sakal
पुणे - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अनेक वर्षांपासून बंद असलेली पदभरती तत्काळ सुरू करावी, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना २४ वर्षांनंतर मिळणाऱ्या लाभानुसार त्यांची वेतन निश्चिती पूर्वीप्रमाणे करावी, माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक पदासाठी पात्र असणारे शिक्षकेतर कर्मचारी यांना वेतनश्रेणी संरक्षणासह शिक्षक पदावर विनाअट पदोन्नती द्यावी, यांसह अन्य प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांच्या महामंडळातर्फे शिक्षण आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.