बारामतीत नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन

नगरपालिकेच्या 13 कोटींच्या घनकचरा निविदांचा कालावधी उलटून गेल्यावरही कामाचा आदेश न देता निविदा कार्यवाही सुरु ठेवण्यात आली.
Agitation in baramati
Agitation in baramatiSakal
Summary

नगरपालिकेच्या 13 कोटींच्या घनकचरा निविदांचा कालावधी उलटून गेल्यावरही कामाचा आदेश न देता निविदा कार्यवाही सुरु ठेवण्यात आली.

बारामती - नगरपालिकेच्या सुमारे 13 कोटींच्या घनकचरा निविदांचा कालावधी उलटून गेल्यावरही कामाचा आदेश न देता निविदा कार्यवाही सुरु ठेवण्यात आली असून, ही निविदा प्रक्रीया रद्द करुन फेरनिविदा काढावी या मागणीसाठी नगरपालिकेसमोर आज ठिय्या आंदोलन केले गेले.

स्थानिक ठेकेदार व कामगार यात सहभागी झाले होते. दरम्यान मुख्याधिका-यांनी या आरोपांचा इन्कार केला आहे. या प्रक्रीयेची फेरनिविदा काढून जाचक अटी व शर्ती रद्द कराव्यात या साठी ठिय्या आंदोलन केल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष अँड. अमोल सातकर यांनी दिली.

दरम्यान, त्यांनी मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या कार्यपध्दतीवरही नाराजी व्यक्त केली. सातकर म्हणाले, मुख्याधिकारी जेथे बदलून जातात तेथे स्वताःच्या मर्जीतील ठेकेदाराना कामे देतात. मधल्या काळात 25 कोटींची खरेदी झाली असून ही खरेदी विटा, मायणी, शिरुर येथून केली आहे. स्थानिकांना संधी मिळत नाही, त्यांच्या रोजगारावर गदा येते.

मुख्याधिका-यांनी कार्यभार स्विकारल्यापासून जुन्या बँकेतील खाती बंद करुन नवीन बँकेत खाती उघडली, डिझेलपंपही बदलले, बागेतील म्युझिक सिस्टिमदेखील बारामतीबाहेरून खरेदी केली. स्थानिक नागरिकांना डावलून विशिष्ट ठेकेदारालाच काम देण्याचा अट्टाहास कशासाठी असा अँड. सातकर यांनी सवाल केला.

आंदोलनास अँड.अमोल सातकर, शुभम मोरे मानसिंग जाधव, कैलास काकडे, मंगेश मोरे, वल्लभ मलगुंडे, जमिर सय्यद उपस्थित होते.

रितसर निविदा प्रक्रीया

दरम्यान नगरपालिकेतील सर्व कामे रितसर निविदा प्रक्रीया राबवून केली जातात, कचरा संकलनात या अगोदर व या पुढेही स्थानिक कामगारच असतील, तशा सूचना संबंधितांना दिल्या आहेत. कामामध्ये कोणतीही हयगय प्रशासन खपवून घेणार नाही. शंभर टक्के काम करुन बारामती स्वच्छ ठेवण्यास प्राधान्य दिले जात आहे.

- महेश रोकडे, मुख्याधिकारी, बा.न.प.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com