esakal | बारामतीत फासेपारधी समाजाचे आंदोलन 
sakal

बोलून बातमी शोधा

baramati.jpg

फासेपारधी समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात शुक्रवारी बारामतीत रिपब्लिकन पक्षाशी (आठवले गट) संलग्न पारधी समाज आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

बारामतीत फासेपारधी समाजाचे आंदोलन 

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : फासेपारधी समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात शुक्रवारी बारामतीत रिपब्लिकन पक्षाशी (आठवले गट) संलग्न पारधी समाज आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदन देण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सरकारकडे वारंवार पाठपुरावा करुनही फासेपारधी समाजाच्या मागण्यांकडे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप निवेदनात केला आहे. "फासेपारधी समाजाला गावनिहाय शासकीय जागेत किंवा गावठाणात घरकुले बांधून द्यावीत, कसण्यासाठी गायरान किंवा शासकीय जमीन द्यावी, या समाजाला मोफत अन्नधान्य मिळावे, शासकीय जमिनीवर अतिक्रमण केलेले असेल तर ते कायम करून त्यांना शासकीय योजनेतून घरकुल उभारून द्यावे.

Video : अजित पवार यांनी पुण्यातील मेट्रोचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना

 सोनकसवाडी येथील भूदानाची जमीन फासेपारधी समाजाला विभागून द्यावी, शासकीय योजनांचा लाभ व विनातारण कर्ज मिळावे, ज्येष्ठांना श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेचा लाभ द्यावा, या समाजासाठी समाज मंदिरांची उभारणी व्हावी, माळेगावात जळालेली घरे शासकीय निधीतून उभारून द्यावीत, समाजबांधवांवर दाखल झालेले खोटे गुन्हे काढून टाकावेत, शिक्षणासाठी शिष्यवृत्ती व शालेय साहित्य मोफत मिळावे,' अशा मागण्या निवेदनात केल्या आहेत. निवेदनावर जिल्हा पारधी समाज आघाडीचे अध्यक्ष पुरुषोत्तम पवार व जिल्हा भारतील रिपब्लिकन पक्षाचे उपाध्यक्ष विष्णू भोसले यांच्या सह्या आहेत.