esakal | ...म्हणून जहांगीर हॉस्पिटलमधील नर्स अन् स्टाफने घेतला आंदोलनाचा पवित्रा!
sakal

बोलून बातमी शोधा

Pune_Jehangir_Hospital

कोरोनामुळे रुग्णालये आपत्कालीन परिस्थितीत कार्य करत आहेत. अशा वेळी परिचारिकांना (नर्सिंग स्टाफ) वाढीव वेतन देणे शक्‍य होणार नाही. कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन काळजीपूर्वक आणि वेळेवर दिले जात आहे.

...म्हणून जहांगीर हॉस्पिटलमधील नर्स अन् स्टाफने घेतला आंदोलनाचा पवित्रा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : वेतनवाढीच्या मागणीसाठी जहांगीर रुग्णालयातील परिचारिकांनी अचानक आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यामुळे पुणे स्टेशनच्या परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. 
रुग्णालय प्रशासनाकडून चांगली वागणूक मिळत नसल्याचा आरोप करीत शंभरहून अधिक परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी (नर्सिंग स्टाफ) रविवारी (ता.२६) रस्त्यावर येऊन आंदोलन केले.

रुग्णालयाच्या कामाचे तास, मिळणारे वेतन, जेवण आणि राहण्याची सोय आदी मागण्यांसाठी परिचारिका आणि कर्मचारी रस्त्यावर आले. तातडीने पगारात वाढ करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली. या दरम्यान रुग्णालय प्रशासन आणि परिचारिका यांची सायंकाळी उशिरापर्यंत एकत्रित बैठक सुरू होती. 

कॅनॉलमध्ये वाहत चाललेल्या 'त्या' मायलेकींच्या मदतीला धावला देवदूत!​

यासंदर्भात रुग्णालय प्रशासनशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, "कोरोनामुळे रुग्णालये आपत्कालीन परिस्थितीत कार्य करत आहेत. अशा वेळी परिचारिकांना (नर्सिंग स्टाफ) वाढीव वेतन देणे शक्‍य होणार नाही. कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन काळजीपूर्वक आणि वेळेवर दिले जात आहे. कोविड-१९ मुळे बाधित झालेल्या कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांना मोफत उपचार करू, असे आश्‍वासनही देण्यात आले आहे. परंतु काही निवडक लोकांनी रुग्णालयाला चुकीच्या कारणासाठी वेठीस धरल्याचा हा प्रकार आहे.

देशात 'साथरोग नियंत्रण कायदा' लागू असून, सध्या रुग्णांची सेवासुश्रूषा हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. परिस्थिती लक्षात घेऊन त्वरित कामावर हजर व्हावे, अशी विनंती रुग्णालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा कायद्याचे उल्लंघन केले म्हणून आवश्‍यक ती कारवाई करण्यात येईल.'' 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top