पुणे : पाणी बंद ठेवणार नसल्याचे सांगूनही पाण्यासाठी महापालिकेत आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 December 2019

देखभाल-दुरुस्तीसाठी पाणी बंद ठेवणार नसल्याचे जाहीर करूनही येत्या गुरुवारी (ता. २६) पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि मनसेने महापालिकेत आंदोलन केले. पाणीपुरवठा विभागाच्या प्रमुखांच्या टेबलापुढे ठिय्या मांडत आंदोलनकर्त्यांनी त्यांना घेराव घाला. अचानक केलेल्या आंदोलनामुळे गोंधळ उडाला.

पुणे - देखभाल-दुरुस्तीसाठी पाणी बंद ठेवणार नसल्याचे जाहीर करूनही येत्या गुरुवारी (ता. २६) पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि मनसेने महापालिकेत आंदोलन केले. पाणीपुरवठा विभागाच्या प्रमुखांच्या टेबलापुढे ठिय्या मांडत आंदोलनकर्त्यांनी त्यांना घेराव घाला. अचानक केलेल्या आंदोलनामुळे गोंधळ उडाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

दरम्यान, येत्या फेब्रुवारीपर्यंत देखभाल-दुरुस्ती करण्यात येणार नाही. त्यामुळे तोपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवणार नसल्याचा खुलासा पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी केला. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी कुलकर्णींचे दालन सोडले. 

या टिकटॉक गर्लनं लावलं जगाला वेड

देखभाली-दुरुस्तीसाठी दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद केल्याने नागरिकांचे हाल होत असल्याच्या तक्रारी होत्या. या पार्श्‍वभूमीवर अशा प्रकारे आठवड्याला पाणी बंद न करण्याची सूचना तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापलिकेला केली होती, त्यानंतर सुरळीत पाणी देण्यात येईल आणि एकही दिवस पाणी बंद करणार नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. तरीही येत्या गुरुवारी बंद केले जाणार आहे. त्याचा निषेध म्हणून माजी नगरसेविका रूपाली पाटील यांनी भाजप वगळता सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना घेऊन कुलकर्णी यांच्या दालनात आंदोलन केले. हृषीकेश बालगुडे, दीपक मारटकर, महेश हांडे, परेश खांडके, वंदना साळवी हे आंदोलन सहभागी झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agitation for water in Pune municipal caorporation