मनसेच्या दणक्यानंतर पुण्यातील 'या' शाळेने परीक्षा केल्या रद्द

सकाळ वृत्तसेवा
Monday, 3 August 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अग्रेसन हायस्कूलने 31 जुलै ते 7 ऑगस्टदरम्यान नियोजित केलेल्या परीक्षा मनसेच्या मागणीची दखल घेत रद्द केल्या.   

विश्रांतवाडी (पुणे) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अग्रेसन हायस्कूलने 31 जुलै ते 7 ऑगस्टदरम्यान नियोजित केलेल्या परीक्षा मनसेच्या मागणीची दखल घेत रद्द केल्या.   

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

नववीतील नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा शाळेत किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घ्या, या राज्य सरकारच्या आदेशानुसार येरवडा येथील अग्रसेन शाळेने परीक्षा आयोजित केली होती. यासाठी काही पालकांनी काल मनसेच्या महिला सेनेच्या शहराध्यक्ष रूपाली पाटील व वरिष्ठ पदाधिकारी यांच्याकडे तक्रार केली. याची दखल घेत मनसेचे गणेश पाटील, महिला सेना विभाग अध्यक्षा वंदना साळवी, कुलदीप घोडके, सुनील कदम, वाहतूक शाखेचे शहराध्यक्ष किशोर चिंतामणी, महेश शिंदे, राम पाटील आदी पदाधिकारी व पालक प्रतिनिधी यांनी शाळा प्रशासनाशी मनसे स्टाईल चर्चा केली व नियोजित परीक्षा रद्द करा, अशी मागणी  केली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, या मागणीचा तत्काळ विचार करून शाळा प्रशासनाने मनसेचे प्रमुख राज ठाकरे व शहर पक्ष पदाधिकारी यांच्या नावे पत्र दिले. तसेच, परीक्षा रद्द करून ऑनलाइन परीक्षा घेऊ, असे लेखी आश्वासन दिले. यामुळे शाळेचे पालक यांनी मनसेचे आभार व्यक्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agrasen school canceled the exam after mns discussion pune