
१०० कोटी डॉलर गुंतवणूक अपेक्षित
पुढील दीड वर्षात २००० वॅट स्मार्ट सिटी असोसिएशनच्या सहकार्याने अशा विविध टाऊनशिप प्रकल्पांच्या अंतर्गत सुमारे १०० कोटी अमेरिकन डॉलर इतकी गुंतवणूक होणे अपेक्षित आहे. याबरोबरच स्थानिकांना शाश्वत विकासाच्या दृष्टीने कार्बन उत्सर्जन शून्य असणारी स्मार्ट टाऊनशिप देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे भागवत यांनी सांगितले.
हरित टाउनशिपसाठी करारावर स्वाक्षऱ्या
पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी हरित टाऊनशिप उभारण्यात येणार आहे. यासाठी स्वित्झर्लंड येथील २००० वॅट स्मार्ट सिटी असोसिएशनसोबत गुरुवारी प्राधिकरणाने सामंजस्य करार केला. पीएमआरडीए आणि २००० वॅट स्मार्ट सिटी संघटना मिळून एका स्वतंत्र कंपनीची स्थापना करणार असून, त्या माध्यमातून पीएमआरडीएच्या हद्दीत कृषी, सेवा उद्योग समूह, हेल्थकेअर अशा विभागांमध्ये हरित टाऊनशिप उभारणार आहे. एका टाऊनशिपसाठी सुमारे १२५ एकर जागेची आवश्यकता असल्याची माहिती पीएमआरडीएचे आयुक्त विक्रम कुमार यांनी या वेळी दिली. स्वित्झर्लंडचे कौन्सिल जनरल ओथमार हारदेगार, २००० वॅट स्मार्ट सिटी असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव भागवत, पीएमआरडीएचे मुख्य अभियंता विवेक खरवडकर, प्राधिकरणाच्या अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदी आदी मान्यवर उपस्थित होते. हारदेगार म्हणाले, ‘‘२००० वॅट स्मार्ट सिटी असोसिएशनअंतर्गत कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीने भारताने उचललेले हे पाऊल स्वागतार्ह आहे.’
Web Title: Agreement Signature Green Township Pmrda
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..