शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय

farmer.jpg
farmer.jpg

शेटफळगढे (पुणे) : गावातील शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी नैसर्गिक साधन संपत्तीचा विनियोग करणे व त्यामधून हाती घ्यावयाच्या कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यासाठी आता प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये 12 सदस्यीय ग्राम कृषी विकास समिती स्थापन केली जाणार आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम 49 (4) नुसार या समितीची स्थापना होणार आहे.

गावचे सरपंच या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असून, ग्रामसेवक सचिव म्हणून कामकाज पाहणार आहेत. याव्यतिरिक्त उपसरपंच हे पदसिद्ध सदस्य आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त एक ग्रामपंचायत सदस्य, प्रगतशील शेतकरी, विकास सोसायटीचे अध्यक्ष, शेतकरी गट किंवा उत्पादन कंपनीचे प्रतिनिधी, महिला बचत गटाचा प्रतिनिधी, कृषिपूरक व्यावसायिक शेतकरी, तलाठी, कृषी सहायक यांचा या समितीत समावेश करण्यात येणार आहे. सरकारच्या कृषी विभागाने 9 सप्टेंबरच्या शासन निर्णयाच्या आधारे या समित्या गावोगावी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. 

'या' आहेत जबाबदाऱ्या 
या समितीची ग्रामसेवक व कृषी सहायक यांच्या समन्वयातून महिन्यातून एकदा बैठक होणार आहे. ही समिती सरकारच्या कृषी विषयक सर्व शासकीय योजनांची माहिती लोकांपर्यंत पोचविण्यासाठी जनजागृती करणार आहे. तसेच, स्थानिक हवामान, पाऊस, पाण्याची उपलब्धता, जमिनीची प्रत या बाबी लक्षात घेऊन पीक लागवडी संदर्भात आणि आधुनिक तंत्रज्ञान, बियाणे खते, व कृषी निविष्ठा, एकात्मिक कीडनियंत्रण, एकात्मिक पोषण व्यवस्थापन, यांत्रिकीकरण, संरक्षित शेती, फळबाग लागवड या विषयावर ही समिती ग्रामस्थांना मार्गदर्शन करणार आहे. तसेच, शेती पूरक व्यवसाय आणि पीक काढणी व तंत्रज्ञान व विक्रीसाठी बाजारपेठेच्या उपलब्धतेविषयी व शेतीच्या कर्ज पुरवठ्याविषयी या समितीमार्फत संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 

अशी असेल समितीची रचना 
अध्यक्ष- सरपंच 
सचिव- ग्रामसेवक 
पदसिद्ध सदस्य- उपसरपंच 
सदस्य- एक ग्रामपंचायत सदस्य, प्रगतशील शेतकरी, विकास सोसायटी अध्यक्ष, शेतकरी गट किंवा उत्पादन कंपनीचे प्रतिनिधी, महिला बचत गटाचा प्रतिनिधी, कृषिपूरक व्यावसायिक शेतकरी, तलाठी, कृषी सहायक.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com