

Global Recognition: ADT Baramati Selected for Findability Sciences Global AI Award
Sakal
पुणे : कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा प्रभावी अवलंब केल्याबद्दल बारामती येथील ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टची (एडीटी) यंदाच्या ‘फाइंडॅबिलिटी सायन्सेस ग्लोबल एआय अवॉर्ड इंडिया २०२६’ साठी निवड करण्यात आली आहे. ‘फाइंडॅबिलिटी सायन्सेस’च्या संचालक मंडळाकडून नुकतीच याची घोषणा करण्यात आली.