Pune News : सहाय्यक कृषी अधिकारी देणार एका दिवसाचे वेतन; पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात
Flood Relief : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रातील सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांनी सप्टेंबर महिन्याच्या वेतनातून एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे : राज्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्यातील सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचे ठरविले आहे.