Agrowon Anniversary : ‘ॲग्रोवन’ वर्धापन दिनानिमित्त २० एप्रिलला शाश्‍वत शेती परिषदेचे पुण्यात आयोजन

शेतकऱ्यांचे एकमेव मुखपत्र अशी ओळख निर्माण केलेले ‘ॲग्रोवन’ वृत्तपत्र येत्या २० एप्रिल रोजी दोन दशकांची वाटचाल पूर्ण करून २१ व्या वर्षात पदार्पण करत आहे.
agrowon
agrowonsakal
Updated on

पुणे - शेतकऱ्यांचे एकमेव मुखपत्र अशी ओळख निर्माण केलेले ‘ॲग्रोवन’ वृत्तपत्र येत्या २० एप्रिल रोजी दोन दशकांची वाटचाल पूर्ण करून २१ व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्या निमित्ताने पुणे येथे एकदिवसीय ‘शाश्‍वत शेती परिषद’ आयोजित करण्यात आली आहे.

केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेच्या उद्‍घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे उपस्थित राहणार आहेत.

हवामान बदल आणि आस्मानी व सुलतानी संकटांमुळे शेती क्षेत्रात कमालीची अनिश्‍चितता निर्माण झाली आहे. दुसऱ्या बाजूला कृत्रिम बुद्धिमत्ता, आयओटी, काटेकोर शेतीचे युग सुरू झाले आहे. या दोन टोकांची सांगड घालून शेती शाश्‍वत कशी करता येईल, याची विविध प्रारूपे विकसित करण्याची गरज आहे.

शेतकऱ्यांना जमिनीची सुपीकता आणि नावीन्यपूर्ण बाजार विक्री व्यवस्था या संकल्पनांचा अंगीकार करावा लागणार आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या या मुद्यांवर वर्धापन दिनाच्या निमित्ताने मंथन व्हावे, हा या परिषदेमागचा उद्देश आहे.

agrowon qr code
agrowon qr codesakal

बाणेर रस्त्यावरील महाराष्ट्र सरकारच्या ‘यशदा’ या प्रशिक्षण संस्थेच्या मुख्य सभागृहात २० एप्रिलला (रविवारी) सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ या वेळेत ही परिषद होईल. शाश्‍वत शेती या विषयाचा ध्यास घेतलेले आणि स्वतःचे एक प्रारूप विकसित केलेले प्रयोगशील शेतकरी, शास्त्रज्ञ, उद्योजक, धोरणकर्ते, कृषी निविष्ठा क्षेत्रातील कंपन्यांतील वरिष्ठ अधिकारी, जैविक निविष्ठा क्षेत्रातील जाणकार, शेतीमाल पणन विषयातील तज्ज्ञ, कोरडवाहू शेतीचे अभ्यासक या परिषदेत सहभागी होतील. शेती, माती आणि बाजार या तीन पैलूंशी संबंधित विविध विषयांवर या परिषदेत सांगोपांग चर्चा होईल.

...अशी करा नोंदणी

शाश्‍वत शेती परिषदेत अभ्यासू शेतकऱ्यांसह संबंधित विविध घटकांना प्रवेश मोफत असेल. मात्र मर्यादित जागांमुळे पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com