

पान ६ नगर --- तीन फोटो ----
लोगो : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बॅंक निवडणूक विश्लेषण
——
फोटो : बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे पाटील
——
सर्वपक्षीय राजकीय ‘आपलेपणा’
फक्त बॅंकेपुरता की पुढेही राहणार?
सर्वाधिक चर्चा खासदार नीलेश लंकेच्या बॅंकेतील ‘एन्ट्री’ची
सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीनिमित्त सर्वपक्षीय राजकीय नेत्यांत निर्माण झालेला आपलेपणा फक्त बॅंकेपुरताच होता की पुढच्याही निवडणुकीत असाच असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून चर्चांनाही उधान आले आहे.
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत यंदा कट्टर राजकीय विरोधक, तसेच पक्षीय बाबी बाजूला ठेवून नेते एकत्र आले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या नेत्यांनी मिळून बॅंकेवर एकहाती सत्ता आणली. मात्र या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा होत आहे, ती या पॅनेलला टक्कर देत विजय मिळविलेल्या खासदार नीलेश लंके आणि राम शिंदे यांच्या दोन उमेदवारांची.
सहकाराची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यात सहकार वाढविण्यासाठी जिल्हा सहकारी बॅंकेची महत्त्वाची भूमिका असल्याने जिल्हा बॅंकेचे राजकारण कायम अग्रस्थानी राहिले. थोरात, विखे पाटील, कोल्हे, काळे, तनपुरे, ससाणे, गडाख, घुले पाटील, राजळे, नागवडे, जगताप, पिचड, कर्डीले अशा जिल्ह्यातील मात्तब्बर राजकीय घराण्याची बॅंकेवर अनेक वर्षांपासून सत्ता राहिली. या वेळीही याच कुटुंबातील संचालक झाले आहेत. या वेळीच्या निवडणुकीने मात्र जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळा आयाम दिला. जिल्ह्यातील राजकीय नेते वेगवेगळ्या पक्षात आहेत. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका व इतर निवडणुकांत हे नेते एकमेकांवर राजकीय टीका, जोरदार चिखलफेक करतात. काही दिवसांपूर्वीच झालेल्या विधानसभा, लोकसभा व अन्य निवडणुकांमध्ये एकमेकांविरेधात असलेले नेते जिल्हा बॅंकेच्या सत्तेसाठी आपलेपणा दाखवून सर्वपक्षीय नेते एकत्र आले आणि यातून जिल्हा बॅंकेवर सत्ता आणली. जिल्ह्यातील ही महत्वाची राजकीय कुटुंबे आपलेपणा ठेवून एकत्र आले, तर जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळे महत्त्व येऊ शकते हे दाखवून दिले. बॅंकेत ‘सोधा’चे (सोयरेधायरे) राजकारणही जोरात झाले. आता बॅंकेप्रमाणे लवकरच होत असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व इतर निवडणुकांत हे राजकीय नेते असाच आपलेपणा दाखवून कार्यकर्त्यांचे राजकारण सोयीचे करणार की एकमेकांच्या विरोधात उभे करून संघर्ष करायला लावणार. सर्वपक्षीय राजकीय आपलेपणा फक्त बॅंकेपुरता की पुढेही राहणार? याबाबत लोकांत चर्चा सुरू झाली आहे.
————
चौकट -- फोटो निलेश लंके
नीलेश लंकेंचा विजय आणि थेट निशाना
जिल्हा सहकारी बॅंकेच्या राजकारणात थोरात-विखे गटाची संपूर्ण सत्ता आली. मात्र सहकार आणि कारखानदारीशी संबंध नसलेले आणि थोरात-विखे पॅनेलच्या हिटलिस्टवर असलेले खासदार निलेश लंके यांनी आश्चर्यकारक विजय मिळवला. त्यानंतर लगेचच विजयी सभेत ‘बाळासाहेब थोरात आमचे नेते आहेत,’असे सांगताना बॅंकेतील कारभार, कर्जवाटपातील अनियमितता आणि वसुली आजीबाबत थेट इशारा दिला. त्यामुळे बॅंकेत नीलेश लंके यांची झालेली ‘एन्ट्री’ कारखानदारांना अडचणीची ठरू शकते असे राजकीय जाणकार बोलत आहेत.
——
चौकट
मुख्यमंत्री अध्यक्ष ठरवतील : डाॅ. सुजय विखे
जिल्हा सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतर आता अध्यक्षपदाची चर्चा सुरू झाली आहे. माजी खासदार डाॅ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री शंकरराव गडाख, आमदार मोनिका राजळे, रणजितसिंह देशमुख, बिपीन कोल्हे, सचिन जगताप आदी नावे चर्चेत आहेत. सोयीच्या राजकारणात वेगळेही पुढे येऊ शकते. थोरात-विखे पॅनेलचे सर्व संचालक एकत्र असून अध्यक्ष मुख्यमंत्री ठरवतील, असे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.