नगर : अहिल्यानगर जिल्ह्यात वीज, घऱाची भिंत पडून तीघांचा मृत्यु

नगर : अहिल्यानगर जिल्ह्यात वीज, घऱाची भिंत पडून तीघांचा मृत्यु
Published on

अहिल्यानगर जिल्ह्यात वीज,
घराची भिंत पडून तिघांचा मृत्यू
----
अॅग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसात वीज पडून दोघांचा तर दुसऱ्या घटनेत घराची भिंत अंगावर पडून एक अशा तीन जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय जिल्हाभरात पंचवीसपेक्षा अधिक घरांचे नुकसान झाले आहे. वादळाने झालेल्या नुकसानीत जनावरेही दगावली आहेत. जिल्हा प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली.

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, राहाता, जामखेड व अन्य काही भागात मंगळवारी (ता. १२) आणि बुधवारी (ता. १३) वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पाऊस झाला. या पावसात विजांचा कडकडाट, जोरदार वादळ अधिक होते. वादळाने पिकांचे नुकसान झालेच, पण घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. प्रशासनाकडे मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड तालुक्यात ११, संगमनेर १३ आणि राहाता येथे एक अशा पंचवीसपेक्षा अधिक घरांचे नुकसान झाले आहे.
वीज अंगावर पडल्याने मीराबाई सुरेश थोरात (वय ६२, रा. माहेगाव देवी, ता. कोपरगाव) आणि लता कैलास सोनवणे (वय ४२, रा. लोहारे, ता. संगमनेर) यांचा तर महादू दगडू माळी (वय ७०, रा. डिग्रस, ता. संगमनेर) यांचा अंगावर भिंत पडल्याने दबून मृत्यू झाला आहे. संगमनेर, राहाता आणि कोपरगाव तालुक्यांतील ३ मोठी जनावरे तसेच संगमनेर तालुक्यात ५ लहान जनावरांचाही पावसाने मृत्यू झाला आहे. शेतीपिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दोन दिवसांत नुकसानीचा निश्चित आकडा कळेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com