विधान परिषदेच्या निवडणुकीचा बिगूल

विधान परिषदेच्या निवडणुकीचा बिगूल
Published on

जिल्ह्यातील १८ स्थानिक संस्थांमधील ४६१ मतदार

विधान परिषद निवडणुक बिगूल ः स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकरणे मतदार संघ

अहिल्यानगर, ता. १८ ः विधान परिषदेच्या अहिल्यानगर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकरणे मतदार संघातील एका जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. १८ जून रोजी मतदान होऊन २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा आदेश दिला. विधान परिषदेचे सदस्य अरूण बलभीम जगताप यांचा १ जानेवारी २०२२ रोजी या पदाचा कार्यकाळ पूर्ण झाला होता.

जिल्ह्यातील नगरपंचायती, नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका वेळेत न झाल्यामुळे जिल्हा परिषदेचे ७५ सदस्य आणि पंचायत समितीचे १४ सभापती अशी एकूण ८९ पदे सध्या रिक्त आहेत. जिल्ह्यातील १८ स्थानिक संस्थांमधील ५६९ जागांपैकी ४६१ मतदार (नगराध्यक्ष आणि नगरसेवक) सक्रिय आहेत. जिल्ह्यामध्ये ८२.४७ टक्के मतदार कार्यरत असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने निवडणूक विभागाला पाठविला होता. नियमानुसार ७५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदार असल्याने निवडणुका घेण्याची तांत्रिक अडचण दूर झाली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने विधान परिषदेची निवडणूक जाहीर केली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्ह्यात एकूण ५६९ मतदारांपैकी ४६१ सदस्य (नगराध्यक्षांसह नगरसेवक) सद्यस्थितीत कार्यरत आहेत. या निवडणुकीत स्वीकृत नगरसेवकांनाही मतदानाचा अधिकार आहे.
--------------------
स्थानिक संस्था, नगरसेवक, स्वीकृत सदस्य - एकूण
अहिल्यानगर महानगरपालिका ः ६८ -५ -७३
संगमनेर नगरपालिका ः ३१-३ ः ३४
कोपरगाव नगरपालिका ः ३१-३ ः ३४
राहाता नगरपालिका ः २१-२ ः २३
श्रीरामपूर नगरपालिका ः ३५ -४ ः ३९
राहुरी नगरपालिका ः २५ -३ ः २८
देवळाली प्रवरा नगरपालिका ः २२ -२ ः २४
पाथर्डी नगरपालिका ः २१ -२ ः २३
श्रीगोंदे नगरपालिका ः २३ -२ ः २५
शिर्डी नगरपालिका ः २४ -२ ः २६
अकोले नगरपालिका१७-१ ः १८
कर्जत नगरपालिका१७-२ ः १९
पारनेर नगरपंचायत १८-२ ः २०
नेवासे नगरपंचायत १८-२ ः २०
शेवगाव नगरपालिका २५-३ ः २८
जामखेड नगरपालिका २५-३ ः २८

-----------------
निवडणुकीचा कार्यक्रम
अधिकृत अधिसूचना जारी : २५ मे २०२६
अर्ज भरण्याची शेवटची तारीख: १ जून २०२६
अर्जाची छाननी : २ जून २०२६
अर्ज मागे घेण्याची मुदत : ०४ जून २०२६
मतदानः १८ जून २०२६ (सकाळी ८ ते दुपारी ४)
मतमोजणी व निकाल : २२ जून २०२६
-------------
- निवडणूक निर्णय अधिकारी ः जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
- सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ः निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते
-खुल्या गटातील उमेदवारासाठी अनामत ः १० हजार रूपये
-राखीव गटातील उमेदवारासाठी अनामत ः ५ हजार रूपये
-मतदान केंद्र ः प्रत्येक तहसील कार्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com