

प्रवाशाला लुटणारे दोघे जेरबंद
अहिल्यानगर, ता. १९ ः शहरातील स्वास्तिक (पुणे) बसस्थानक परिसरातून एका प्रवाशाचे अपहरण करून बुरुडगाव रस्त्यावरील निर्जनस्थळी मारहाण करून लुटणाऱ्या टोळीतील दोघांना कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांकडून मोबाईल, दुचाकी असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
एस.टी. महामंडळातील लिपिक संग्राम गोपाळकृष्ण झेंडे (रा. चिखली, ता. श्रीगोंदा) हे १५ रोजी बसस्थानकात थांबले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांचे अपहरण करून बुरुडगाव रस्त्यावरील निर्जनस्थळी मारहाण करून लुटले होते. त्यांचा मोबाईल आणि फोन-पेचा पासवर्ड घेऊन त्याआधारे सात हजार रुपये हस्तांतरित केले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गणेश देशमुख तसेच गुन्हे तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण तसेच खबऱ्यांच्या आधारे शोध घेऊन अभिषेक सुनील शिरसाठ (वय २३, रा. अंबर अपार्टमेंट, सावेडी), अनुश शांतवन धीवर (रा. संत ज्ञानेश्वर अपार्टमेंट, सावेडी) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी प्रविण शेजवळ (रा. कोंढवड, ता. राहुरी) याच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली.
सहायक निरीक्षक दीपक मेढे, पोलिस अंमलदार बाळकृष्ण दौंड, रोहिणी दरंदले, राहुल शिंदे, विनोद बोरगे, साबीर शेख, विशाल दळवी, दीपक रोहकले आणि राहुल गुंडू यांच्या पथकाने ही कारवाई केली.
..............
अपहरण करून निर्जनस्थळी लूट
बसस्थानक परिसरातून प्रवाशाचे अपहरण करून त्याला बुरुडगाव रस्त्यावरील निर्जनस्थळी नेण्यात आले. तेथे मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल व फोन-पेचा पासवर्ड घेण्यात आला. त्यानंतर आरोपींनी खात्यातून सात हजार रुपये हस्तांतरित केले. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.