Dimbhe Dam
sakal
मंचर - आंबेगाव तालुक्यात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. मंगळवार (ता. ७) ते बुधवार (ता. ८) सकाळी ८ वाजेपर्यंत आहुपे येथे सर्वाधिक ४०७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, यंदाच्या हंगामातील एकूण पाऊस १ हजार ६९७ मिलिमीटर झाला आहे. तर भीमाशंकर येथे २४ तासांत २९७ मिलिमीटर आणि आजअखेर १ हजार ८४८ मिलिमीटर पावसाची विक्रमी नोंद झाली आहे.