

बदनामी प्रकरणी ॲट्रॉसिटीसह
कलमांची वाढ
श्रीरामपूर, ता. १९ : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) साधनांचा गैरवापर करून एका महिलेचे मॉर्फ केलेले आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर प्रसारित करून बदनामी केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने तपास करत एका २१ वर्षीय तरुणीचा सहभाग निष्पन्न केला. पीडित महिला अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याने तिच्या पुरवणी जबाबावरून पोलिसांनी संबंधित तरुणीविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलमांची वाढ केली आहे.
पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, सोशल मीडियावर त्यांच्या छायाचित्राचा वापर करून आक्षेपार्ह मजकूर व फोटो प्रसारित करण्यात आले होते. या पोस्टमुळे नातेवाईक, मित्रपरिवार तसेच समाजात बदनामी झाली. महिलेच्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास करताना शहर पोलिस आणि अहिल्यानगर सायबर सेलने संबंधित सोशल मीडिया खात्याचा तांत्रिक माग काढला. त्यानंतर संबंधित तरुणीच्या घरी जाऊन पोलिसांनी शोध घेतला; मात्र ती पसार झाली. दरम्यान, पीडितेच्या पुरवणी जबाबावरून गुन्ह्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमातील कलमांत वाढ करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक विशाल खैरे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.