माळेगाव - कृत्रिम बुद्धिमत्ता व अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे (एआय) ऊस उत्पादनात क्रांती होणार आहे. अर्थात ही प्रणाली कमी कालावधीत अधिक गतीने महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांपर्यंत पोचवी, यासाठी वसंतदादा शुगर इन्स्ट्यिट्युट (व्हीएसआय) आणि बारामती कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली यापुढे जोमाने काम करणार आहे.
त्या पार्श्वभूमिवर कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी आश्चर्यकारक एआय ऊस शेती बारामती कृषी विज्ञान केंद्रात पाहिल्याचे समाधान आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काॅग्रेस शरदचंद्र पवार पक्षाते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केली.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती संचलित कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यस्थळावर कृत्रिम बुद्धिमत्ता व अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे (एआय) ऊस उत्पादनाचा यशस्वी प्रकल्प उभारला आहे. त्यानुसार हा प्रकल्प समजून घेण्यासाठी व्हीएसआयचे संशोधक व अधिकार्यांबरोबर आज ज्येष्ठ नेते शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, राजेंद्र पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री.पाटील पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले,' कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर कृषी क्षेत्रात झाला, तर त्याचे सकारात्मक परिणाम आगामी काळात दिसून येतील.
एआयमुळे ऊस उत्पादनात क्रांती होणार आहे.ऊस लागवडीखालील क्षेत्रफळामध्ये भारत सर्वात मोठा देश असला तरी हेक्टरी उत्पादकतेमध्ये ब्राझील देशाच्या तुलनेत मागे आहे. अगदी भारतातही तमिळनाडू राज्यापेक्षाही महाराष्ट्र ऊस उत्पादकतेत पिछाडीवर आहे.
त्यामागे जमिनीची कमी सुपीकता, अयोग्य व्यवस्थापन पद्धती, गुणवत्तापूर्ण बेण्याची कमतरता, खत व पाण्याचा असंतुलित वापर, वातावरण बदल, कीड व रोगांचा वाढत चाललेला प्रादुर्भाव, अयोग्य वेळी तोडणीमध्ये घटणारे वजन अशी अनेक कारणे दिसतात. या समस्यांवर मात करण्याच्या उद्देशाने ऊस शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्राचा वापर करण्यासंदर्भात बारामती कृषी विज्ञान केंद्रात आश्चर्यकारक काम झाले आहे.`
पवारसाहेबांप्रमाणे माझेही इतरांशी संबंध...
महाराष्ट्राच्या विधान सभा निवडणूकीमध्ये जरी आमच्या मोजक्या जागा आम्हाला मिळाल्या असल्या, तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाची मोठी ताकद राज्यात आहे, हे लोकसभेच्या निवडणूकीमध्ये दिसले. त्यामुळे हा पक्ष निश्चित आगामी काळात मजबुतीने पुढे नेण्याची आम्ही जबाबदारी स्वीकारली आहे. असे असताना सातत्याने मला पक्ष सोडणार का? असे विचारले जाते.
वास्तविक पवारसाहेबांप्रमाणे माझेही इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांचे उत्तम संबंध आहेत. विधिमंडळातील अर्थसंकल्पीय भाषणात मी केलेले भाष्य माध्यमांनी निट समजून घेतले पाहिजे. माझे काही खरे नाही, हे वाक्य शक्तीपिठ महामार्गाच्या विषयाच्या अनुषंगाने बोललो होतो. मी नाराज नाही. त्याचा विपर्यास नको. जातीर्धमात तेड निर्माण होईल, अशी वक्तव्य लोक प्रतिनिधींना शोधत नाही, असेही निलेश राणे यांचे नाव न घेता पाटील यांनी ठासून सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.