

Tukaram Mundhe
esakal
पुणे - खाद्यपदार्थांबाबत यापूर्वी एखाद्या आस्थापनेने कोणता गुन्हा केला, त्यावर काही कारवाई झाली होती का? याचा इतिहास समजणार आहे. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून एकात्मिक ऑनलाइन प्रणाली राबविण्यात येणार आहे. त्यामुळे एकाच व्यक्तीच्या नावावर असलेल्या विविध आस्थापना व त्यांनी खाद्यपदार्थ मानकांचे केलेले उल्लंघन याची माहिती मिळेल, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी (ता. १८) दिली.