
पुणे : रेल्वे प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या बिछान्याच्या संचासाठी (लिनन) आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर सुरू झाला आहे. यामुळे प्रवाशांना स्वच्छ आणि चांगल्या दर्जाचे ब्लँकेट, बेडशीट व उशी मिळत आहे. रेल्वेने आपल्या ‘बूट लॉँड्री’मध्ये ‘एआय’चा वापर सुरू केला आहे. देशात पहिल्यांदाच पुणे विभागात असा प्रयोग सुरू आहे.