
Defence Tech
Sakal
पुणे : देशातील युवकांना संरक्षणविषयक नवोन्मेषासाठी (इनोव्हेशन) आणि स्वदेशी क्षमतांचा विस्तार वाढविण्यासाठी आता अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) एक पाऊल पुढे टाकले आहे. संरक्षण क्षेत्रातील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानातील ‘मायनर डिग्री अभ्यासक्रमासाठी ‘एआयसीटीई’ने आता ‘मॉडेल’ अभ्यासक्रम जाहीर केला आहे. भारताला संरक्षण क्षेत्रात जागतिक स्तरावर महासत्ता बनवायचे असेल तर या क्षेत्रातील सक्षम आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन हा अभ्यासक्रम तयार करण्यात आल्याचे ‘एआयसीटीई’ने अधोरेखित केले.