दहा लाख टन गाळप करण्याचे उद्दिष्ट

दहा लाख टन गाळप करण्याचे उद्दिष्ट

पारगाव, ता. ६ : ‘‘भीमाशंकर साखर कारखान्याच्या सन २०२४-२५ गळीत हंगामाची पूर्व तयारी सुरू झाली आहे. येत्या हंगाम २०२४-२५ मध्ये १० लाख टन गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. हंगामाकरिता कारखान्यातील मशिनरी ओव्हरऑयलिंग, रिपेअरींग कामे सुरू केली असून, जर वेळेत पूर्ण करून ऑक्टोबर महिन्यात यंत्रणा गाळपासाठी सज्ज राहण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे,’’ अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगाम २०२४-२५ च्या पूर्व तयारी अंतर्गत मशिनरी देखभाल करून जोडणीच्या कामाचा प्रारंभ व मिल रोलर पूजन कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे व उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांच्या हस्ते नुकताच करण्यात आले.

यावेळी बेंडे म्हणाले की, कारखान्याचे संस्थापक-संचालक तसेच महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गळीत हंगाम वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक असणारी ऊस तोड वाहतूक वाहन टोळी, ट्रॅक्टर टायरगाडी, टायर बैलगाडी व ऊस तोडणी यंत्राचे करार लवकरच सुरू करणार आहोत. मागील हंगामाप्रमाणे येणारा गाळप हंगाम असल्याने ऊस उत्पादक, तोडणी वाहतूक कंत्राटदार, तोडणी मजुर, अधिकारी व कर्मचारी यांनी हंगाम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सहकार्य करावे.

दरम्यान, मागील वर्षातील सभासद व ऊस उत्पादकांना सवलतीच्या दरात देण्यात येणारी साखर वाटपाचा कालावधी वाढवून सप्टेंबर २०२४ पर्यंत प्रत्येक महिन्याचे पहिल्या शनिवारी वाटप करण्यात येणार असून, साखर न नेलेल्या सभासदांनी व ऊस उत्पादकांनी आपली राहिलेली साखर घेवून जावे, असे आवाहन उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी केले.

मिल रोलर पूजनप्रसंगी कारखान्याचे संचालक बाळासाहेब घुले, रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, दादाभाऊ पोखरकर, आनंदराव शिंदे, मच्छिंद्र गावडे, बाजीराव बारवे, सीताराम लोहोट, ज्ञानेश्वर अस्वारे, रामहरी पोंदे, पोपटराव थिटे, संचालिका पुष्पलता जाधव, प्रिया बाणखेले, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, सचिव रामनाथ हिंगे, ब्रिजेश लोहोट, कामगार कल्याण अधिकारी चंद्रशेखर मगर, अनिल बोंबले, सुनील कालेकर, अमीर पठाण, सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे आदी उपस्थित होते.

04144

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com