पुण्यातील पोलिसाची मुंबईत आत्महत्या; स्वत:वर झाडली गोळी

Crime_Suicide
Crime_Suicide

हडपसर (पुणे) : मुंबई येथील एपीएमसी पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक भूषण पवार यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी अकरा वाजण्य़ाच्या सुमारास घडली. आत्महत्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पवार हे यापूर्वी हडपसर पोलिस ठाण्यात सेवेत होते. ते आपली पत्नी आणि दोन मुलांसह हडपसरमधील भोसले गार्डन परिसरात राहत होते. हडपसर तपास पथकात असताना त्यांनी अनेक गुन्हे उघडकीस आणले होते. तसेच त्यांचा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दांडगा जनसंपर्क होता. प्रामाणिक आणि कष्टाळू अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पवार हे सकाळी स्वतःच्या केबीनमध्ये जाउन शांत बसले. त्यानंतर काही वेळात गोळी झाडल्याचा आवाज आला. त्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी डोक्यात गोळी झाडल्याचे निदर्शनास आले. दरम्यान पवार हे मागील काही दिवसांपासून मानसिक तणावात होते. ते सतत शांत बसायचे. लोकांमध्ये मिसळत नव्हते. आर्थिक कारणातून त्यांनी हे पाउल उचलले असावे, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com