वातानुकूलित ई-बस पुणेकरांच्या सेवेत रूजू (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 फेब्रुवारी 2019

पुणे : पुणे स्मार्ट सिटी अंतर्गत 25 ईबस आणि 10 तेजस्विनी बसेसचे लोकार्पन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज शनिवारी सणस मैदाण येथे पार पडले.  
यावेळी मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर,  महापौर मुक्ता टिळक, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, योगेश टिळेकर आदी उपस्थित होते. 

पुणे : पुणे स्मार्ट सिटी अंतर्गत 25 ईबस आणि 10 तेजस्विनी बसेसचे लोकार्पन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज शनिवारी सणस मैदाण येथे पार पडले.  
यावेळी मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, महापौर मुक्ता टिळक, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, योगेश टिळेकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांचे हस्ते लोकार्पण झाले असून शनिवारपासून मार्गावर कार्यरत होणार आहे. अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या वातानुकूलित ई-बसेस अखेर पुणेकरांच्या सेवेत रूजू होणार आहेत. इतर बसच्या तिकीट दराप्रमाणेच या बसचे तिकीट दर असून प्रवाशांना कमी पैशांमध्ये आरामदायी प्रवास करणे शक्य होणार आहे. पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये सात मार्गांवर या बसचे नियोजन करण्यात आले आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात ५०० एसी ई-बस भाडेतत्वावर येणार आहेत. पहिल्या टप्प्यातील नऊ मीटर लांबीच्या २५ ई-बसचे आज लोकार्पण पार पडले. सर्वप्रकारचे पासही या बसमध्ये चालणार असून वातानुकुलित व आरामदायी बसमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुसह्य झाले आहे. या बससाठी निगडी व भेकराईनगर येथे चार्जिंग स्टेशन देखील उभारण्यात आली आहेत. एकुण सात मार्ग निश्चित झाले असून त्यातील चार मार्ग पुण्यातील तर तीन मार्ग पिंपरी चिंचवडमध्ये असणार आहेत. पुढील आठवड्यात या बसेसचे नियमित संचलन होईल. 

या मार्गावर धावणार ई-बस

१. डांगे चौक ते हिंजवडी माण फेज ३ : बस- ६, फेऱ्या - ९६, वारंवारिता - २० मिनिटे.
२. आकुर्डी रेल्वे स्टेशन ते मनपा : बस - २, फेऱ्या - २०, वारंवारिता - ४५ मिनिटे.
. निगडी ते भोसरी : बस - २, फेऱ्या - ४८, वारंवारिता - ६० मिनिटे.
४. हडपसर ते पिंपळे गुरव : बस - ३,फेऱ्या - ६०, वारंवारिता - ३० मिनिटे.
५. भेकराईनगर ते न. ता. वाडी : बस - ३, फेऱ्या - ४८, वारंवारिता - ४५ मिनिटे.
६. भेकराईनगर ते पुणे स्टेशन : बस -३,फेऱ्या - ५४,वारंवारिता - ३० मिनिटे.
७. हडपसर ते हिंजवडी माण फेज ३ :बस - ३,फेऱ्या - १८, वारंवारिता - ६० मिनिटे.

अशी असेल ई-बस - आरामदायी बैठक व्यवस्था
-
आसनक्षमता - ३१
- मोबाईल चार्जिंगची सुविधा
- पॅनिक बटन
- सीसीटीव्ही
- इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट. सिस्टीम (आयटीएमएस)
- तीन तासात बॅटरी चार्जिंगमध्ये २०० किलोमीटर अंतर धावणार
- एका युनिटमध्ये ३ किलोमीटर अंतर धावणार
- प्रदुषण कमी होणार

स्वारगेट मल्टिमोडल हब वैशिष्ट्ये
- मेट्रो, एसटी आणि पीएमपी अशा तिन्ही वाहतूक सेवांचे एकत्रीकरण.
- खासगी प्रवासी वाहने आणि रिक्षांसाठी स्वतंत्र व्यवस्था.
- मेट्रो स्टेशन आणि एसटी बस स्थानकाला जोडणाऱ्या भुयारी मार्गाचे काम महामेट्रो करणार.
- व्यावसायिक संकुलाची निर्मिती "सार्वजनिक - खाजगी भागीदारी " (पीपीपी) स्वरूपात.
- दोन टप्प्यात होणार काम.
- पहिल्या टप्प्यात महामेट्रोच्या भुयारी स्टेशनसह पीएमपीच्या स्टेशन, डेपोचा पुनर्विकास आणि पालिकेच्या साठवण टाक्याचे बांधकाम.
- दुसऱ्या टप्प्यात एसटीच्या जागेचा पुनर्विकास


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: air-conditioned e-buses are serving in Pune