Air Force Chief : हवाईदल प्रमुखांची कृत्रिम अवयव केंद्राला भेट; जखमी जवानांच्या पुनर्वसनाचे कौतुक
Amarpreet Singh : हवाईदल प्रमुख अमरप्रीत सिंग यांनी पुण्यातील कृत्रिम अवयव केंद्राला भेट देत ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये जखमी झालेल्या जवानाची भेट घेतली आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सेवेचे कौतुक केले
पुणे : हवाईदल प्रमुख अमरप्रीत सिंग यांनी कृत्रिम अवयव केंद्राला (आर्टिफिशियल लिंब सेंटर) मंगळवारी भेट दिली. ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान जखमी झालेले कॉर्पोरल वरुण कुमार यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.