'एअर इंडिया'ला सुरक्षा यंत्रणेतून दरवर्षी 23 कोटींचे उत्पन्न

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 डिसेंबर 2019

- 'एअर इंडिया'च्या संरक्षण यंत्रणेतून कंपनीला दरवर्षी 23 कोटी रुपये मिळताहेत.

मुंबई : कर्जबाजारी झाल्याने बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या 'एअर इंडिया'च्या संरक्षण यंत्रणेतून कंपनीला दरवर्षी 23 कोटी रुपये मिळत माहिती समोर आली आहे. विमानसेवा पुरवणार्‍या जगभरातील विविध कंपन्यांना 'एअर इंडिया'च्या देशातील चार सेंटरमधील तीन हजार 600 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सुरक्षा यंत्रणा पुरवली जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याबाबत सविस्तर माहिती अशी की, 'इयर इंडिया'कडून 'एव्हिएशन सिक्युरिटी ट्रेनिंग नावाचे इन्स्टिट्यूट' चालवले जात आहे. 'ब्युरो ऑफ सिव्हिलायझेशन सिक्युरिटी'कडून या इन्स्टिट्यूटला मान्यता देण्यात आली आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि हैदराबाद येथे त्याचे सेंटर सुरू करण्यात आली आहेत. सेंटरमध्ये कायम आणि ठेकेदारी पद्धतीवर असणारे तीन हजार 600 सुरक्षा कर्मचारी कार्यरत आहेत.

आणखी वाचा - 'माफी मागायला माझं नावा राहुल सावरकर नाही'

परदेशी विमान कंपनीचे एखादे विमान देशात दाखल झाल्यानंतर त्यासाठी आवश्यक असणारे सुरक्षा कर्मचारी संबंधित कंपनीकडे आसतातच असे नाही. त्यामुळे त्यांना 'एअर इंडिया'चे सुरक्षा कर्मचारी परदेशी विमान कंपनीला भाडेतत्वावर दिले जातात. त्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्यामागे प्रति तास 11 डॉलर फी आकाजली जाते. या बाबतचे काही करार देखील करण्यात आले आहेत.

एका परदेशी विमानाला सुमारे दोन तासांसाठी किमान 17 कर्मचारी नियुक्त केले जातात, अशी माहिती सेंटरमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. विमानामध्ये सामान भरत असताना त्यावर लक्ष ठेवणे, प्रवाशांना विमानात बसवेपर्यंत त्यांना मदत करणे. तसेच जेवणाची ट्रॉली विमानात पोचवणे, अशी कामे या कर्मचाऱ्यांना दिली जातात.

सध्या 'एअर इंडिया'वर हजारो कोटी रुपयांचे कर्जाचे ओझे असून, कंपनी तोट्यात आहे. एअर इंडिया'चे पुनरूज्जीवन करण्यासाठी केंद्र सरकारने निर्गुंतवणुकीचा निर्णय घेतला आहे. या सर्वात सुरक्षा यंत्रणेकडून मिळालेले उत्पन्न कंपनीसाठी संजिवनी ठरत आहे.

दरवर्षी दिले जाते प्रशिक्षण

भरती करण्यात येत नसली तरी सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बळावर योग्यप्रकारे सुरक्षा पुरवली जात आहे. नागरी वाहतूक ही हल्ला करण्यासाठी नेहमीच 'सॉफ्ट टार्गेट' समजले जाते. त्यामुळे आमचे कर्मचारी सुरक्षेच्यादृष्टीने अद्ययावत व्हावे म्हणून त्यांना दरवर्षी योग्य ते प्रशिक्षण देण्यात येते, असे येथील प्रमुखांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: AIr India got 23 Crores Annually from Security system