esakal | माझं नाव राहुल सावरकर नाही, तर राहुल गांधी!; मरण पत्करेन पण...
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi

काँग्रेस कार्यकर्ता घाबरत नाही. मी कधीच माफी मागणार नाही. नरेंद्र मोदींनी देशाची माफी मागावी. अमित शहा यांनीही देशाची माफी मागावी. देशासाठी प्राण देण्यास काँग्रेस कार्यकर्ता तयार आहे. मोदींच्या तडाख्याने भारतीय अर्थव्यवस्था ढासळली.

माझं नाव राहुल सावरकर नाही, तर राहुल गांधी!; मरण पत्करेन पण...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारताची अर्थव्यवस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी नष्ट करून टाकली. भाजपचे नेते मी माफी मागावी, अशी मागणी करत होते. पण, मी त्यांना सांगतो की माझे नाव राहुल सावरकर नाही, तर राहुल गांधी आहे. मी मरण पत्करेन पण कधीच माफी मागणार नाही, नरेंद्र मोदी आणि अमित शहांनीच माफी मागायला हवी, अशी जोरदार टीका काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आर्थिक मंदी, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न या मुद्द्यांवर आक्रमक होत काँग्रेसकडून आज (शनिवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात 'भारत बचाओ' रॅलीचे आयोजन केले होते. दिल्लीत रामलीला मैदानावर 'भारत बचाओ रॅली' घेण्यात आली. या रॅलीद्वारे काँग्रेसने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या रॅलीला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.

भारत बचाओ, भारत बचाओ! रॅली काढत काँग्रेस उतरलं दिल्लीच्या मैदानात

राहुल गांधी म्हणाले, की काँग्रेस कार्यकर्ता घाबरत नाही. मी कधीच माफी मागणार नाही. नरेंद्र मोदींनी देशाची माफी मागावी. अमित शहा यांनीही देशाची माफी मागावी. देशासाठी प्राण देण्यास काँग्रेस कार्यकर्ता तयार आहे. मोदींच्या तडाख्याने भारतीय अर्थव्यवस्था ढासळली. जीडीपीचा दर 9 टक्क्यांवरून साडेचार टक्क्यांवर आला आहे. गब्बरसिंग टॅक्सने देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करून ठेवली. मोदींचे निर्णय याला कारणीभूत आहेत. भारताचे शत्रू जे विचार करत होते, ते काम आज नरेंद्र मोदी करत आहेत. दोन-तीन उद्योगपतींच्या खिशात सर्व पैशे घातले. सध्या देशातील 43 वर्षांतील सर्वांत मोठी बेरोजगारी आहे. फक्त अदानीला 50 कंत्राट मोदींनी दिले आहेत. अदानीला पैसे देणे भ्रष्टाचार नाही का? उद्योगपतींचे 60 हजार कोटींचे कर्ज माफ केले. सर्वसामन्यांचे पैसे अदानी, अंबानी यांना देण्यात आले. देशात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, याची माहिती केंद्र सरकारला नाही. याची सरकारला लाज वाटली पाहिजे. काश्मिर, ईशान्येकडील राज्यांत मोदींनी आग लावून ठेवली आहे. देशाचे विभाजन करण्याचे प्रयत्न सरकार करत आहे. मोदी-शहा देशाला धर्माच्या नावावर वाटण्याचे काम करत आहेत. सध्याची माध्यमे का शांत आहेत. 

लोकशाहीची हत्या करून अर्थव्यवस्था 'आयसीयू'त : राहुल गांधी