Air India Pune Delhi Flight Cancelled: अहमदबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या भीषण अपघातानंतर वारंवार या घडामोडी समोर यायला लागल्या आहेत. ताज्या घटनेमध्ये पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर देखील एअर इंडियाच्या विमानाचं उड्डाण रद्द करावं लागलं आहे. या विमानाला हवेत पक्ष्याची धडक लागल्यानं विमानाचं सिक्युरिटी चेक केल्यानंतर या विमानाचं पुढचं उड्डाण रद्द करण्यात आलं. एअर इंडियानं स्वतः ही माहिती दिली आहे.