Air Pollution : खासगी वाहनांनी बिघडवली पुणे शहराची हवा

पुणे शहरातील हवा प्रदूषण कमी होण्याऐवजी वाढत आहे.
Pune air-pollution
Pune air-pollutionsakal

पुणे - शहरातील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र शासनाकडून १५ व्या वित्त आयोगातून कोट्यावधी रुपयांचा निधी महापालिकेला मिळत आहे. पण शहरातील हवा प्रदूषण कमी होण्याऐवजी वाढत आहे. गेल्या वर्षभरात पीएमपीच्या ताब्यात एकही नवीन बस दाखल झालेली नाही.

तर दुसरीकडे २०२२ मध्ये एका वर्षात २ लाख ५५ हजार ७५७ नवी खासगी वाहने रस्‍त्यावर धावत आहेत. एकूण वाहनांची संख्या ३५ लाख ९४ हजार १३२ इतकी झाली आहे. वाढती वाहनांची संख्या व वाढते शहरीकरणामुळे शहराची हवी प्रदूषित होत असल्याचा निष्कर्ष पर्यावरण अहवालातून काढण्यात आला आहे.

पुणे महापालिकेच्या पर्यावरण विभागाने ‘पर्यावरण सद्यःस्थिती अहवाल २०२२-२३’ स्थायी समितीसमोर सादर केला आहे. त्यामध्ये शहरातील हवा, पाणी, हरित क्षेत्र, पशू पक्षी, वीज वापर, नदीमध्ये मिश्रित होणारे सांडपाणी, वाहतूक व्यवस्था यासह इतर घटकांची सद्यःस्थिती मांडण्यात आलेली आहे. यामध्ये हवी प्रदूषणाबाबत गंभीर नोंदी नोंदविण्यात आल्या आहेत.

केंद्र सरकारतर्फे देश स्तरावर राष्ट्रीय शुद्ध हवा उपक्रम (नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम -एनसीएपी) राबविला जात आहे. त्यामध्ये देशातील १३१ प्रदूषित शहरांची यादी तयार केली असून, त्यात पुण्याचा समावेश आहे.

केंद्र सरकारने पुण्यातील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेला उपाय योजना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी १५व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून कामे केली जात आहेत. यासाठी २०२५-२६ पर्यंत धुलिकणांचे प्रमाण १० मायक्रॉनपर्यंत (पी.एम. १०) आणि अतिसूक्ष्म धुलिकणांचे प्रमाण २.५ मायक्रॉनपर्यंत (पी.एम.२.५ ) कमी करण्याचे प्रयत्न केले जात आहे.

अहवालात २०१९-२०ची माहिती नमूद केली आहे. यामध्ये शहरातील पी.एम. १० धुलिकणांचे प्रमाणे ८६.६० तर पी. एम. २.५ अति सुक्ष्म धुलिकणांचे प्रमाणे हे ४६.४० इतके होते असे नमूद केले आहे. महापालिकेने २०२२ साठी धुलिकणांचे मोजमाप केले त्यामध्ये या दोन्ही प्रकारच्या धुलिकणांचे प्रमाण शिवाजीनगर आणि हडपसर भागात जास्त असल्याचे नमूद केले आहे. तर कात्रज आणि पाषाण येथील प्रमाण कमी झाले आहे.

शहरातील धुलिकणांचे प्रमाण वाढण्यास वाढती वाहनांची संख्या व शहरीकरण कारणीभूत आहे. २०२० आणि २०२१ मध्ये नवीन वाहनांची नोंदणी घटलेली होती, पण २०२२ मध्ये यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. पी. एम. १० आणि पी.एम. २.५ या दोन्ही धुलिकणांचे प्रमाण वाहनांमधून धुरामुळे वाढत आहे, असे अहवालात नमूद केले आहे.

पीएमपीची संख्या वाढणे आवश्‍यक

शहरातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत होऊन त्याचा वापर वाढणे आवश्‍यक आहे. पीएमपीच्या ताफ्यात १४२१ सीएजी बस आणि ४५८ इ बस आहेत. त्यामुळे हवा प्रदूषण कमी झाले आहे आहे.

पण आॅगस्ट २०२२ मध्ये पीएमपीच्या ताफ्यात १५० इ बस दाखल झाल्या. त्यानंतर गेल्या वर्षभरात एकही बस नव्याने खरेदी केलेली नाही. त्या उलट ३२७ बस या ११ ते १२ वर्ष वापरात असून, त्यांचे आयुर्मान संपलेले आहे. पीएमपीचे सक्षमीकरण होत नसल्याने नागरिकांचा कल खासगी वाहने खरेदीकडे वाढला आहे.

‘पंधराव्या वित्त आयोगातून महापालिकेला शहरातील हवा शुद्ध करण्यासाठी निधी प्राप्त होत आहे. हवा प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, ते २०२५-२६ पर्यंत त्याची मुदत आहे. त्यामुळे आत्ताच त्याचे परिणाम जाणवणार नाहीत. खासगी वाहनांची संख्या व मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये वाढणारे शहरीकरण यामुळे शहराचे प्रदूषण वाढत आहे.’

- मंगेश दिघे, पर्यावरण अधिकारी, महापालिका

पर्यावरण अहवालातील प्रमुख निरीक्षणे

- वेताळ टेकडीवर २५३, पाषाण तलाव परिसरात २३६ प्रजातीचे पक्षी आढळून आले.

- ओल्या कचऱ्यातून निर्माण होणारा बायोगॅस पीएमटीचे इंधन म्हणून वापर

- उरुळी फुरसुंगी येथे २१ हजार वृक्षांची लागवड

- २०२१ मध्ये ४४६३.५७ दशलक्ष युनिट वीजेचा वापर होता. २०२२ मध्ये हा वापर ४९८२.८९ दशलक्ष युनिट इतका वाढला.

- विजेची सर्वाधिक मागणी रहिवासी, औद्योगिक करणासाठी आहे

- माझी वसुंधरा स्पर्धेत महापालिकेचा तृतीय क्रमांकाचे पारितोषिक

अशी वाढली वाहनांची संख्या

२०१९ - २,३९,६६०

२०२०- १,४९, २३५

२०२१ - १,६९,५५२

२०२२ - २,५५,७५७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com