

Pune Airport Activates Low Visibility Procedures (LVP)
Sakal
पुणे : पुण्यात थंडीचा कडाका वाढत असून, सकाळी शहराच्या विविध भागांत दाट धुक्याची चादर पसरत आहे. तरीही पुणे विमानतळावरील सेवा बाधित झाली नसली तरीही विमानतळ प्रशासनाने खबरदारी म्हणून धुके व्यवस्थापन (फॉग मॅनेजमेंट) अंतर्गत उपाययोजना केल्या आहेत. प्रवाशांच्या गर्दीचे व्यवस्थापन ते कमी दृश्यमानतेत उपयोगी पडणारी नियमावली (एलव्हीपी) लागू केली आहे. त्यामुळे धुक्यातही विमानांचे सुरक्षित लँडिंग होत आहे. पुणे विमानतळ प्रशासनाची विमान कंपन्या, हवाई नियंत्रण कक्ष, खाद्यपदार्थ विक्रेते व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलासमवेत (सीआयएसएफ)