Rajgad cow vigilante attack on a youth; extortion and assault case
वेल्हे (पुणे) : वेल्हा तालुक्यातील आस्कवडी फाटा परिसरात गोरक्षक gअसल्याचा दावा करत एका तरुणास अडवून त्याचे अपहरण, मारहाण व खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात शनिवार (ता.13) रोजी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादू लिम्हण, अक्षय धावले (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) आणि त्यांचे इतर चार अनोळखी साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वेल्ह्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांनी दिली.