Ajit Pawar Funeral
sakal
बारामती - आपल्या लाडक्या अजितदादांना अखेरचा निरोप देताना बारामती आज धाय मोकलून रडली. ‘दादा परत या...’ ही आबालवृद्धांची आर्त हाक हृदये विदीर्ण करून गेली. ‘विद्या प्रतिष्ठान’च्या मैदानावर अश्रूंचा महापूर आला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्याला कायमचे सोडून गेले आहेत, यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता.
अनेक वादळांचा खंबीरपणे सामना करणारा शरद पवार नावाचा योद्धाही शोकाकुल झाला. येणाऱ्या प्रत्येकाचे सांत्वन थरथरणाऱ्या हाताने स्वीकारत ते धीरोदात्तपणे उभे होते, पण त्यांच्या मनातील कालवाकालवही लपून राहिली नाही.