Malegaon Sugar Factory Election : माळेगाव कारखाना निवडणूकीचे अजित पवारांनी फुंकले रणसिंग

माळेगाव सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नजीकच्या काळात कोणत्याही क्षणी लागण्याचे दिले संकेत.
Ajit Pawar
Ajit Pawarsakal
Updated on

माळेगाव - माळेगाव सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नजीकच्या काळात शासनस्तरावर जाहीर होईल. या निवडणूकीत दोन अथवा तीन पॅनेल होतात, हे आत्ताच सांगता येणार नाही.

सभासद भावांनो.. मागिल निवडणूकीत जेवढ्या विश्वासाने तुम्ही माझ्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ निवडून दिले, त्याच विश्वासाने माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे, विद्यामान अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप यांनी राज्यात विक्रमी ऊस दर दिला.

यापुढेही केंद्र व राज्य सरकार आपल्या विचाराचे आहे. माळेगावचा सर्वांगिण विकास करण्यात मी कमी पडणार नाही. कार्यकर्त्यांनी निवडणूक तयारीला लागावे, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

माळेगाव (ता. बारामती) कारखाना कार्यस्थळावर नूतनीकरण झालेल्या आश्वारूढ पुतळ्याचे आनावरण प्रसंगी अजित पवार बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, अॅड. केशवराव जगताप, उपाध्यक्ष राजेंद्र ढवाण, ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे, संचालक तानाजी देवकाते, अनिल तावरे,मदनराव देवकाते, योगेश जगताप, तानाजी देवकाते, नितीन सातव, दत्तात्रेय येळे, मंगेश जगताप, स्वप्नील जगताप, बन्शीलाल आटोळे, सागर जाधव, संजय काटे, प्रताप आटोळे, गुलाबराव गावडे, संगिता कोकरे, पंकज भोसले, निशिगंध निकम, कार्यकारी संचालक अशोक पाटील आदी उपस्थित होते.

नीरा नदीचे प्रदूषित पाणी, साखर कामगारांचा वेतन वाढ प्रश्न, काही संचालकांचे गैरवर्तन, ऊस दरासाठी झालेल्या आंदोलनाचा अजित पवार यांनी भाषणात धागा पडकला. पवार म्हणाले,`` नीरा नदीच्या प्रदूषणाचा विषय अनेक वर्षांचा प्रलंबित आहे. त्या समस्येला मीच जबाबदार आहे, हे म्हणणे कितपत योग्य आहे.

मी जर प्रदूषण नियंत्रण मंडळाला कठोर कारवाईचे आदेश दिले तर नीरा नदी काठाचे माळेगाव,सोमेश्वरसह सर्वच कारखाने बंद पडतील. त्यात पुन्हा शेतकर्‍यांचे नुकसान होईल. वास्तविक कारखान्यांमधून निघणाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण करून ते पाणी शेतीला सोडण्याच्या सूचना मी दिल्यात.

माळेगावच्या साखर कामगारांची वेतन वाढ त्रिपक्षीय करारानुसार होईल. माझ्या स्वभावात मी बदल केला तसा तुम्ही संचालकांनीही सभासदांशी अरेरावीने वागू नये. माळेगाव हा नेहमीच एफआरपीपेक्षा विक्रमी ऊस दर देणारा कारखाना म्हणून राज्यात ओळखला जातो. गतवर्षी राज्यात प्रथम क्रमांकाचा प्रतिटन ३६३६, तर यंदा ३१३२ रुपये अॅडव्हास दर दिला आहे.

त्यामुळे यंदाच्या निवडणूकीत सभासदांनी पुन्हा माझ्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ निवडून देण्याचा विचार करावा.` असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अनिल धुमाळ यांनी केले, तर आभार मदनराव देवकाते यांनी मानले.

पवारांनी दिली ज्येष्ठांवर जबाबदारी

माळेगाव कारखान्याची निवडणूक तोंडावर आली आहे. बाळासाहेब तावरे, मदनराव देवकाते, अॅड. केशवराव जगताप या ज्येष्ठांनी एकत्र बसून सहा गटात कोणाला आगामी निवडणूकीत उमेदवारी द्यायची हे ठरवावे. शेवटी नवीन चेहऱ्यांना संधी देण्याबरोबरच जुन्या संचालक मंडळात कोणाला पुन्हा संधी द्यायची हे ठरविणे सोपे जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com